शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोषीला फाशी द्या; सरकार पक्षाची मागणी

By admin | Updated: October 29, 2015 00:52 IST

सॉफ्टवेअर इंजिनीयर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी ३९ वर्षीय ड्रायव्हरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राज्य सरकारने विशेष महिला न्यायालयापुढे बुधवारी केली

मुंबई: सॉफ्टवेअर इंजिनीयर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी ३९ वर्षीय ड्रायव्हरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राज्य सरकारने विशेष महिला न्यायालयापुढे बुधवारी केली. विशेष महिला न्यायालयाने ३० आॅक्टोबरपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे. ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी सरकारी वकिलांनी ३४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी वकिलांनी ड्रायव्हर चंद्रभान सानप याच्यावरील आरोप सिद्ध केल्याने, विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी सानप याला मंगळवारी दोषी ठरवले. त्यावरून विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सानपला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष महिला न्यायालयाकडे केली. ‘सानप स्त्रीलंपट असून, त्याचा स्वभावच असा आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी,’ असे अ‍ॅड. ठाकरे यांनी म्हटले. त्यावर सानपच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सानपचे वय लक्षात घेता, त्याला कमीत कमी शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सानपच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला केली.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. वृषाली जोशी यांनी ३० आॅक्टोबरला निकाल देऊ, असे म्हटले. गोरेगाव येथील टीसीएस कंपनीत काम करणारी २३ वर्षीय टेकी ५ जानेवारी रोजी गायब झाली. घरच्यांबरोबर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये गेलेली टेकी ५ जानेवारी रोजी पहाटे ४:५५ वाजता एलटीटी स्टेशनवर उतरली. मात्र, ती गोरेगावला पोहोचलीच नाही. तिचा अर्धा जळलेला मृतदेह कांजूरमार्ग येथील खारफुटीजवळ आढळला. १६ जानेवारी रोजी पोलिसांनी टेकीच्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप याला अटक केली. (प्रतिनिधी)