शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पूर हाताळण्यास पालिकेची यंत्रणा तोकडीच..!

By admin | Updated: August 5, 2016 00:30 IST

चार-दोन वीजपंप, दोन चालविता न येणाऱ्या बोटी, काही दोरखंड व कर्मचारी आणि इतक्याच आधारावर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग बुधवारच्या पुरात कार्यरत होता.

पुणे : इमारतीत शिरलेले पाणी खेचण्यासाठी चार-दोन वीजपंप, दोन चालविता न येणाऱ्या बोटी, काही दोरखंड व कर्मचारी आणि इतक्याच आधारावर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग बुधवारच्या पुरात कार्यरत होता.सुदैवाने काही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही, पाऊसही थांबला; मात्र तो वाढला असता, धरणातून आणखी वेगात पाणी सोडले असते, तर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावरच आपत्ती ओढवली असती, अशी स्थिती होती. या विभागाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या कोणत्याही अत्याधुनिक साधनसुविधा नाहीत. पालिका प्रशासन या विषयाला गंभीरपणे घेत नसल्याचा पुरावा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुखाकडे त्या विभागाव्यतिरिक्त आणखी एका विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अतिशय तोकड्या साधनसुविधांच्या साह्याने या विभागाला काम करावे लागत आहे. विविध विभागांशी संपर्क साधून त्यांचे साह्य घेऊन बुधवारच्या पुराचा दिवस या विभागाने कसा तरी निभावला. (प्रतिनिधी)>सिंहगड रस्त्यावरच्या नदीकाठालगतच्या वसाहती, मंगळवार पेठेतील नदीलगतची झोपडपट्टी, तसेच नदीच्या पाण्याखाली गेलेला भिडे पूल या तीन ठिकाणी बुधवारी सर्वाधिक गंभीर परिस्थिती होती. धरणातून पाणी सोडणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला बुधवारी सकाळी मिळाली. त्यानंतर त्यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली. नदीकाठालगतच्या रहिवाशांना सूचना देण्यात आल्या.एनडीआरएफची एक टीम तयार ठेवण्यात आली. अग्निशामक दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांना माहिती देण्यात आली. पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली, तर निवाऱ्यासाठी शाळांची व्यवस्था करण्यात आली. महसूल विभाग, वीजवितरण कंपनी, मोटार वाहन विभाग यांनाही पुराच्या पाण्याची माहिती देऊन सज्ज राहण्यास सांगण्यात आले. पाणी शिरलेल्या इमारतींमधील पाणी वीजपंपाने खेचून काढण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर थोडा कमी झाला. गुरुवारी सकाळी पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. वरिष्ठांना माहिती देण्यातच मग्न असलेला आपत्ती व्यवस्थापन विभागही मग थंडावला.