शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील महिलांसाठी हातसडीच्या तांदळाचा उपक्रम

By admin | Updated: April 30, 2016 03:20 IST

विक्रममगड तालुका हा आदिवासी भाग असून येथील मुख्य व्यावसाय व उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे भातशेती आहे़

विक्रमगड/तलवाडा : विक्रममगड तालुका हा आदिवासी भाग असून येथील मुख्य व्यावसाय व उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे भातशेती आहे़ या तालुक्यात गावठी तांदुळ मोठया प्रमाणावर पिकवला जातो़ या तांदळाला बाहेर व तालुक्यातही मोठी मागणी आहे़ या पार्श्वभूमीवर येथील आदिवासी महिलांनी बचतगटांच्या माध्यमातुन घरातच हातसडीच्या तांदळाचा उपक्रम राबविल्यास मोठा स्वयंरोजगार उपलब्ध होउ शकतो असे विक्रमगड येथील राईसमिलमध्ये पावसाळयासाठी भात भरडाई करण्यासाठी आलेल्या आदिवासी शेतकरी जयराम लक्षी भावर यांनी यावेळी सांगीतले़आता गाव-खेडयापाडयातील महिलाही चक्कीमध्ये जाऊन भाताची भरडाई व डबल पॉलिक करुन घेतात त्यामध्ये जो हातसडीच्या तांदुळातुन कस मिळु शकतो तो पॉलिश केलेल्या व मिलमध्ये भरडाई केलेल्या तांदळात नाही़ आज हा तांदुळ हातसडीचा तांदुळ दुर्मिळ झाला असुन त्याची मागणी वाढली आहे़ त्याअनुशंगाने हातसडीचा तांदुळ येथील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून तयार करुन त्याची विक्री केल्यास एक स्वयंरोजगार मिळु शकतो़ या भागातील उत्कृष्ट प्रतीच्या (गावठी) तांदळाचा वापर करुन हातसडीचा तांदुळ तयार करता येतो़. हा तांदुळ लाकडाच्या उभ्या खोलगट उखळीत टाकुन लाकडाच्या गोल मुसळाच्या साहायाने अंगमेहनीतीने सडला जातो़ त्यामुळे भाताच्या टरफलाखालील नैसर्गीक असलेली बी जीवनसत्वे, खनिजे, प्रोटीन या तांदळात असल्याने बी जिवनसत्वाच्या अभावाने होणारे बेरीबेरी, अशक्तपणा, तोंड येणे, पचनक्रियेत दोष, आळस, हातपायांना मुंग्या, स्रायुंना पेटके आदी रोग होत नाहीत़ दोन वर्षापुर्वी विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा आणि आजुबाजुच्या आदिवासी भागातील महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळावा या उददेशाने हातसडीच्या तांदळाचा रोजागार उपलब्ध करुन देण्यात आला होता़ विक्रमगड कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हातसडीचा तांदुळ तयार करण्याच नियोजन आणि संकल्पना तसेच कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग या योजनेअंतर्गत उपक्रम राबविला आला होता व राबविला जाऊ शकतो़. (वार्ताहर)