शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पंतप्रधानांच्या हवाली करा

By admin | Updated: December 8, 2014 08:41 IST

मुंबईच्या विकास प्रक्रि येत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे,

नवी दिल्ली : मुंबईच्या विकास प्रक्रियेत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे, अशी आग्रहवजा सूचना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीरविवारी झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत केली.महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राने सढळहस्ते मदत करावी, कापूस आणि ऊस पीकाला योग्य भाव मिळण्यासाठी विशेष योजना तयार करावी अशी मागणीही त्यांनीकेली.बैठकीत फडणवीस यांनी नियोजन आयोगाची उपयोगिता संपली असून त्याऐवजी अधिक विस्तारित आण िराज्यांच्या अधिक सहभाग असलेली राष्ट्रीय आर्थिक विकास व सुधारणा मंडळ अशी संस्था तयार करण्यात यावी,या भूमिकेवर जोर दिला. ते म्हणाले, या रचनेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व पूर्वोत्तर अशी प्रादेशिक मंडळे तयार करण्यात यावीत. पंतप्रधान हे त्या मंडळांचे अध्यक्ष असतील व राज्यांचे मुख्यमंत्री सदस्य असतील, दर तीन महिन्यांनी या प्रादेशिक मंडळाची व राष्ट्रीय मंडळाची बैठक दरवर्षी घेण्यात यावी. देशाचे नियोजन पाच वर्षाचे न राहता ते दीर्घ काळासाठी केले पाहिजे. आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर केंद्र व राज्यांमध्ये चर्चा होऊन कायदे तयार केले पाहिजेत. सीआरझेड, इको सेन्सीटीव्ह झोन, भुमिअधिग्रहण कायदा आदी कायदयांमुळे विकासात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे राज्यांशी चर्चा करून या केंद्रीय कायद्यांमध्ये बदल व्हायला हवा.प्रादेशिक मंडळाचे निर्णय राष्ट्रीय कार्यसूची म्हणून मान्य व्हायला हवेत. केंद्राचा निधी वर्षाच्या शेवटी न वितरित करता तो नियमति वितरीत केला जावा. राष्ट्रीय रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा योजना राबविण्याकरिता राज्यांना थेट निधी दिला पाहिजे. या योजना राबविण्यासाठी राज्यांना त्यांचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची सवलत दिली पाहिजे, अशी भूमिकाही फडणवीस यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी)