शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

हातात घड्याळ.. कमळावर बाण!

By admin | Updated: February 5, 2017 23:54 IST

पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी जमलेली. एकाच घरातील पंधरा-वीस मंडळी तावातावानं आपलं गाऱ्हाणं सांगत होती. प्रत्येकाची तक्रार एकच होती, ‘आमच्या घरातला पांडोबा उमेदवार गायब

पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी जमलेली. एकाच घरातील पंधरा-वीस मंडळी तावातावानं आपलं गाऱ्हाणं सांगत होती. प्रत्येकाची तक्रार एकच होती, ‘आमच्या घरातला पांडोबा उमेदवार गायब झालाय.’ठाणे अंमलदार : (कानात काडी घालून निवांतपणे फिरवत) हे बघाऽऽ तुम्ही असा कलकलाट कराल तर डायरीला नोंदच होणार नाही कसली. प्रत्येकानं शांतपणे मला नीट माहिती द्यायला पाहिजे. पांडोबाची आई : मी सांगते अण्णासायब अगुदरऽऽ पांडोबा माजा मुलगा हाय. अंमलदार : (लिहून घेत) अंऽऽ काय करतो पांडोबा? वडील : (मिशाला पीळ देत) राजकारणात हाय. पाच वरसं सतरंज्या उचलत हुता. आता स्टेजवर भाषण ठोकतूया. अंमलदार : अहोऽऽ त्याचा पोटपाण्याचा व्यवसाय काय? भाऊ : ह्योच की राजकारणाचा.. टेंडर घेणं, वाटून देणं. नंतर वाटा घेणं. अंमलदार : कधीपासून गायब झालाय?वहिनी : काल सकाळपास्नं. अर्ज भरायला म्हणुनशान गेलेत... तिकडंच गायब. फोनबी नाय, मेशेजबी नाय. अंमलदार: (पांडोबा भावी लोकप्रतिनिधी असू शकतो, हे लक्षात येताच पूर्णपणे भाषा बदलत) कोणत्या पक्षाकडून अर्ज भरलाय पांडोबारावांनी? पत्नी : परवा रात्री झोपताना मला म्हणत होते की, ‘हातात हात घालून राजकारण केलेलं बरं. आज नाही तर उद्या साडेसाती संपेलच की यांचीबीऽऽ.’अंमलदार : (नोंद करत) म्हणजे हाताचे अधिकृत उमेदवार आहेत पांडोबाराव. वडील : (नकारार्थी मान हलवत) नाऽऽय. काल सकाळी त्यानं हातवाल्याचा येबी फॉर्म दिला टाकुनशान. मला म्हनाला, ‘अण्णाऽऽ घड्याळाचा गजर यैकायला लईऽऽ भारी वाटतूया नां? मग घिऊनशान टाकू त्यांचाच फॉर्म!’ अंमलदार : (हाताची नोंद खोडत) म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर ते उभारलेत.आई : (कमरेला पदर खोचून) छ्या. छ्या. माज्या हातचा गोड च्या पिताना माजं लेकरू म्हनालं, ‘आयेऽऽ त्ये इंजिनवाले लईऽऽ मागं लागल्याती. या वॉर्डात मला अन् शेजारच्या वॉर्डात तुला तिकीट देतू म्हंत्याती. येकवर येक फ्री.’ अंमलदार : (गोंधळात पडत) म्हणजे इंजिनावर दोघं उभारलेत तुमच्या घरातले. भाऊ : (ठसक्यात) नाय वो अण्णासायब... ‘माय-लेकराचा काळ’ गेला कवाच. कायबी फुकटात मिळतंया म्हणुनशान काय झालं, शेवटी ब्रॅण्डबी लई महत्त्वाचं असतंया ना? म्हणुनशान त्यानं घराभाईर पडल्यावर ‘धनुष्यबाण’वाल्याचा फॉर्म घेतला. अंमलदार : (चरफडत पुन्हा खाडाखोड) म्हणजे ‘जय महाराष्ट्र’ म्हणा की. वहिनी : ते बी नाय झालं... फॉर्म भरायला जाताना रस्त्यामंदी ‘हरेक माल’गाडीवर त्यांना ‘कमळ’ दिसलं. फकस्त ‘दोन पेटी’मंदी म्हनं कुणालाबी मिळत हुतं तिकीट. आमचे भावजी भौतेक तिकडंच गेले हायती. अंमलदार : (आता मात्र खाडाखोडीच्या कागदाचा पूर्णपणे बोळा करून थेट टोपलीत) यानंतर कुठला बदल झाला नाही नां.. पांडूच्या भूमिकेत? सारे जण एकसुरात : त्येच तर म्हैत नाय ना... कारण अर्ज भरल्यापास्नं त्यो गायबच झाला हाय. (एवढ्यात खुद्द पांडोबा स्वत: प्रकटतो)पांडोबा : अण्णासायब... माज्या घरच्यांची कम्प्लेट घिऊ नगा. म्या ‘अपक्ष’ अर्ज भरूनशान आलूया... कारण आवंदा म्हनं अपक्षांच्याच ताब्यामंदीच ‘सत्तेची चावी’ राहणार हाय!अंमलदार : अरेऽऽ पण.. कालपासून होतास कुठं ?पांडोबा : (गालातल्या गालात हसत ) संमद्या नेत्यांना भेटुनशान आलू. ‘निकालानंतर तुमच्या भौमताचा आकडा वाढवायास्नी म्या हाईच,’ हे अगुुदरच त्यांना सांगुनशान आलूया न्हवं.’- सचिन जवळकोटे