शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

ईशान्य मुंबईत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: January 20, 2017 02:05 IST

पालिकेने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.

मुंबई : मतांसाठी भूमाफियांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय मंडळींची सध्या ईशान्य मुंबईत कोंडी होताना दिसते आहे. पालिकेने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. आचारसंहितेदरम्यान त्यावर दबाव आणणे त्यांना शक्य नाही. अशातच जो उमेदवार आपले बांधकाम रोखू शकत नाही त्याला मतदान का करायचे, असा सवाल उपस्थित करत मतदार त्यांच्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. उत्तर पूर्व मुंबईत पालिकेतील दिग्गज नेते मंडळी आहेत. त्यात अनेक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची वाळवी वाढत आहे. त्यांच्यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द शिवाजी नगर परिसरात अनधिकृत बांधकामांना खतपाणी घातले आहे. भांडुपसह विक्रोळीच्या सूर्यानगर परिसरातील डोंगराळ भाग पूर्णपणे काबीज करण्यात आला आहे. भांडुप सोनापूर परिसरात हे बांधकाम तीन मजल्यांपर्यंत पोहोचले आहे. मतदारांना खूश करण्यासाठी ही नेते मंडळी त्यांना पाठीशी घालत असे. त्यात कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना यांच्या राजकीय दबावाला तोंड द्यावे लागत होते.निवडणुकीच्या तोंडावर मात्र चित्र वेगळे आहे. पालिका अधिकाऱ्यांनी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालविण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत चाळीही पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या जात आहेत. आचारसंहितेत बांधकाम रोखण्याचा प्रयत्न अंगलट येण्याच्या भीतीने नेतेमंडळी शांत आहेत. मात्र राजकीय नेत्यांच्या या भूमिकेमुळे अनधिकृत वस्तीत वसलेले रहिवासी, भूमाफिया त्यांच्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. आपला भावी नगरसेवक आपले घर वाचवू शकत नाही तर तो पुढे काय मदत करणार? या विचारांत हा मतदार वर्ग आहे. त्यांच्या मदतीसाठी पडद्याआड जमेल तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने या मंडळींची कोंडी सुरू आहे. (प्रतिनिधी)>मतदान करा... अनधिकृत बांधकाम वाचवायाच संधीचा फायदा घेत विरोधक मंडळी अशा मतदारांना गाठून त्यांचे मतपरिवर्तन करताना दिसले. आम्हाला मतदान करा... निवडून आल्यावर तुमच्या बांधकामांना कोणीही हात लावणार नाही, असे आश्वासन देण्यातही ते मागे नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ईशान्य मुंबईत चर्चेचा विषय ठरणार आहे.