शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमधील अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 03:26 IST

मुंबई-गोवा मार्गावर माणगाव हद्दीत असणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम बुधवारी १८ जानेवारीला राबविण्यात आली

माणगाव : मुंबई-गोवा मार्गावर माणगाव हद्दीत असणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम बुधवारी १८ जानेवारीला राबविण्यात आली. अनेक टपरीधारक आणि छोट्या व्यावसायिकांनी नोटीस बजावल्यानंतर स्वत:च अतिक्रमण काढल्याने कारवाई करण्याची वेळ आली नाही. मात्र कारवाईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १८ जानेवारीला सकाळीच ७ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेण कार्यालयाचे उपअभियंता गायकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. रस्त्यांच्या दुतर्फा असणारे अतिक्र मण हटवण्यात आले. यामध्ये दुकानांवर लावलेले बोर्ड, हातगाड्या, बॅनर, छोट्या टपऱ्या तोडण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेणकडून १० जानेवारीला सुमारे ८० नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसा देऊन चार दिवसात अतिक्र मण हटविण्याची सूचना के ली होती. तसेच रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मीटरपर्यंत अतिक्र मण हटवण्यास नोटीसमध्ये सांगितले होते. राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेण यांनी महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही कारवाई केली. पेण कार्यालयातून नोटीस आल्यानंतर माणगावमधील बऱ्याच जणांनी आपणहून केलेली अतिक्रमणे हटवली. या मोहिमेत सहभागी होऊन बांधकाम विभागास सहकार्य केले. यामुळे मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)>नगरपंचायतीने लक्ष ठेवावेमाणगावमध्ये केलेले अतिक्र मण तोडण्यासाठी नोटीस काही दिवस आधी दिली होती. त्याप्रमाणे आम्ही अतिक्र मणविरोधात ही कारवाई केली, तसेच सध्या रस्ता सुरक्षा अभियान पंधरवडा सुरू आहे. आता परत अतिक्र मण होऊ नये म्हणून माणगाव नगरपंचायतीने लक्ष ठेवावे.- पी.पी. गायकवाड, उप अभियंताराष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेण यांनी माणगाव महामार्गावरील अतिक्र मण काढणार आहोत आम्हाला पोलीस संरक्षण हवे असल्याचे सांगितले. म्हणून आम्ही सर्व पोलीस कर्मचारी फोर्स घेऊन या मोहिमेत सहभागी होतो. या वेळी सर्व माणगावकरांनी कोणताही अनुचित प्रकार न करता मोहिमेस सहकार्य दाखवले.-ए.बी.लेंगरे, पोलीस निरीक्षक, माणगाव