शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाची आवक निम्म्यावर

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

अकोला बाजार समितीत धान्याची आवक मंदावली.

विवेक चांदूरकर/अकोला : ऐन हंगामात पावसाची दांडी, त्यानंतर चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस, यामुळे यावर्षी खरीप व रब्बी हंगामात पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन, तुरीसह अन्य पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्याचे बाजार समितीतील शेतमालाच्या खरेदीवरून लक्षात येते. अकोला बाजार समितीत गतवर्षी ५ एप्रिलपर्यंत १४ लाख २४ हजार ८00 क्विंटल धान्याची आवक झाली होती, यावर्षी केवळ ९ लाख ७६ हजार ६१३ क्विंटल धान्याची आवक झाली आहे. २0१४-१५ च्या खरीप हंगामाच्या वेळी पावसाळ्यात पावसाने दांडी दिली. पाऊस तब्बल दोन महिने उशिरा आला, त्यानंतर रब्बी पिकाच्या वेळी चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस आला. त्यामुळे यावर्षी शेतमाल उत्पादनात प्रचंड घट आली आहे. मूग व उडिदाच्या पेरणीच्या वेळी पाऊस आला नाही. त्यामुळे या पिकांची पेरणीच करण्यात आली नाही. सोयाबीन, तुरीसह अन्य पिकांच्या उत्पादनातही ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आली आहे. शेतकरी त्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आणतात. यावर्षी अकोला बाजार समितीत गतवषीच्या तुलनेत निम्म्या शेतमालाची विक्री करण्यात आली. बाजार समितीत गतवर्षी ५ एप्रिलपर्यंत ७ लाख ३५ हजार ९७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावर्षी मात्र ४ लाख ५६६ क्विंटल आवक झाली. सोयाबीनचा हंगाम संपला असून, यावर्षी ३ लाख ३५ हजार ५६६ क्विंटल आवक कमी झाली आहे. सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील ७0 टक्के शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात. त्यामुळे सोयाबीनच्या बाजार समितीतील खरेदीवरून उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे लक्षात येते. हरभर्‍याची खरेदी गतवर्षी ५ एप्रिलपर्यंत ३ लाख २५ हजार ८४२ क्विंटल करण्यात आली होती. यावर्षी मात्र २ लाख ७३ हजार ४४१ क्विंटल करण्यात आली आहे. हरभर्‍याची आवक ५२ हजार क्विंटलने कमी झाली आहे. *अवकाळी पावसाचा काही पिकांना फायदा अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काही पिकांना फायदा झाला आहे. गतवर्षी ९ एप्रिलपर्यंत गव्हाची ३२ हजार ८८९ क्विंटल आवक झाली होती, यावर्षी ४५ हजार ३५५ क्विंटल आवक झाली आहे. मका पिकाची गतवर्षी ८१४ क्विंटल आवक झाली, तर यावर्षी ११५६ क्विंटल आवक झाली.