शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हाजी अली प्रवेशाचा निर्णय २८ जूनला

By admin | Updated: June 10, 2016 05:25 IST

भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेने उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने २८ जूनपर्यंत राखून ठेवला आहे

मुंबई : हजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशासंदर्भात भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेने उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने २८ जूनपर्यंत राखून ठेवला आहे. दर्ग्यातील मजारमध्ये (गाभारा) महिलांना २०१२ मध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. दर्गा व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरुद्ध याचिका करण्यात आली होती. शनी शिंगणापूर पाठोपाठ आता हजी अली दर्ग्यातील मजारमध्ये महिलांना प्रवेश मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - डेरे यांच्या खंडपीठाने गुरुवारच्या सुनावणीत या याचिकेवरील निर्णय २८ जूनपर्यंत राखून ठेवला. दरम्यान, खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरामध्ये काही आदेश दिले आहेत का? अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी काही आदेश किंवा अंतरिम आदेश दिले असल्यास सादर करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांचे वकील राजु मोरे यांना दिले. तसेच काहीच महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी शनी शिंगणापूर महिला प्रवेशबंदी संदर्भात दिलेल्या आदेशाची प्रतही सादर करण्याचे निर्देश अ‍ॅड. मोरे यांना दिले. ‘शनी शिंगणापूरसंदर्भात देण्यात आलेला निकाल वेगळ्या कायद्यांतर्गत देण्यात असला तरी आमच्यासमोर असलेल्या याचिकेमध्ये आणि त्या याचिकेमध्ये साम्य आहे. त्यामुळे त्या याचिकेमध्ये मुख्य न्यायाधीशांनी काय निरीक्षण नोंदवले आहे, ते आम्हाला बघू द्या,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील निर्णय २८ जूनपर्यंत राखून ठेवला. तर दर्गा व्यवस्थापनाने महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. धर्माला अनुसरून आचरण करण्याचा अधिकार राज्यतघटनेने दिला आहे. प्रथा व परंपरा लक्षात घेऊनच मजारमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे, असा युक्तिवाद दर्गा व्यवस्थापनाने केला होता. (प्रतिनिधी) >दर्ग्यामध्ये प्रवेशबंदी दर्ग्यामध्ये प्रवेशबंदी करणे, हा कुराणचा अंतर्भूत गाभा असेल तर महिलांना हजीअली दर्ग्याच्या गाभाऱ्यात जाण्यास घालण्यात आलेली बंदी योग्य ठरवावी. मात्र तज्ज्ञांनी कुराणाचा असा अर्थ लावला असेल, तर ही बंदी लागू करण्यात येऊ नये. धर्माचा गाभा नसलेल्या प्रथा, परंपरा मुलभूत अधिकाराच्या आड येता कामा नयेत, अशी भूमिका सरकारने या प्रकरणी घेतली आहे.