शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

केस कापणे झाले महाग!

By admin | Updated: May 20, 2017 02:50 IST

राज्यातील हेअर कटिंग सलून आणि पार्लरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने या वर्षी हेअर कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला

- चेतन ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील हेअर कटिंग सलून आणि पार्लरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने या वर्षी हेअर कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान १० टक्के दरवाढ करण्यास असोसिएशनने परवानगी दिल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक यादव यांनी सांगितले की, दरवर्षी असोसिएशनकडून किमान दरवाढ सुचविली जाते. त्यानंतर विभागनिहाय बैठका होऊन दरवाढ केली जाते. १ एप्रिलपासून नवी दरवाढ राज्यभरात लागू करण्यास असोसिएशनने सांगितले आहे. यापुढे टप्प्याटप्प्याने विभागनिहाय बैठका झाल्यावर संपूर्ण राज्यभर ही दरवाढ लागू झालेली दिसेल. दरवर्षी १ जानेवारीला ही दरवाढ घोषित केली जाते. मात्र यंदा नोटाबंदीच्या निर्णयामुळे दरवाढ लांबणीवर गेली. तरी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या सलून व पार्लरमध्ये ही दरवाढ लागू होईल.अशी होईल वाढ‘अ’ दर्जात मोडणाऱ्या वातानुकूलित आणि नामांकित सलूनमध्ये १० टक्क्यांनी वाढ होईल. त्यानुसार केस कापून घेण्यासाठी या सलूनमध्ये आता १०० रुपयांपासून १५० रुपये मोजावे लागतील. याउलट ‘ब’ व ‘क’ दर्जातील दरवाढ ही १५ ते २० टक्क्यांनी झाल्याचे दिसते. याआधी ‘ब’ दर्जाच्या सलूनमध्ये ७० रुपये आकारण्यात येत होते, त्या ठिकाणी आता ८० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. तर ‘क’ दर्जाच्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी ४० रुपयांऐवजी आता ५० रुपये मोजावे लागणार आहेत.दाढीचे दर ‘जैसे थे’, कटिंग २५ टक्क्यांनी महागलीकेस कापून घेण्यासाठी सर्वसामान्यांना ४० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार असले, तरी दाढीसाठी मात्र पूर्वीप्रमाणेच ३० रुपये मोजावे लागणार आहेत. घरीच दाढी करण्याची विविध साधने उपलब्ध झाल्याने दाढीच्या दरात वाढ केली नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. याउलट हेअर कटिंग ही २५ टक्क्यांपर्यंत महागल्याचे दिसले.