शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नारायणपुरात ‘दिगंबरा’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 01:18 IST

मध्य प्रदेश, तमिळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांतून आलेले हजारो भाविक उपस्थित होते

नारायणपूर : श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने पहाटेपासून महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, तमिळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांतून आलेले हजारो भाविक उपस्थित होते. नारायणमहाराज यांच्या हस्ते गुरू व्यास महर्षी यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित भाविकांनी ‘दिगंबरा दिगंबरा’चा जयघोष केला. या जयघोषाने हा परिसर दुमदुमला. देशभरातून आलेल्या भाविकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून त्या भाविकांचा सन्मान करण्यात आला. दत्तमंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने अवघा परिसर लखलखून निघाला होता. चार कोपऱ्यांतून चार भाविकांना पादुका पूजनाचा मान मिळाला. यामध्ये नामदेव जाधव (कुंजीरवाडी, हवेली), गोपीनाथ आगळे (पोखरी, संगमनेर), रमेश बबन भागात (राजुरी, पुरंदर), आनंद शेटे (अकोला, संगनमेर) यांचा समावेश होता. श्री गुरुदेव दत्त यांच्या पादुका व नारायणमहाराज यांचे पूजनप्रसंगी वैधानिक विकास महामंडळाचे मा. अध्यक्ष उल्हास पवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अ‍ॅड. शशिकांत पागे, अशोक मोहळ, गणेश भिंताडे, डॉ. उमेशकुमार डोंगरे, कन्याकुमारीचे अरुण पाटील, महेश वकील, नितीन निकम, दीपक साळुंखे, मध्य प्रदेशचे वीरेंद्र जैन, मुकेश पटेल, लवीश जैन, भरत क्षीरसागर, बबनभाऊ टकले, एम. के. गायकवाड उपस्थित होते.>पहाटे ४ ते ६ या काळात पादुका व मूर्तींना रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर ८.३० ते ९ आरती, १० ते ११.३० होमहवन, १२.३० ते २ व्यासपूजन. २.२० ते ३ सदगुरू नारायणमहाराज यांचे प्रवचन, ३ वाजता महाआरती, दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नारायणमहाराज यांच्या शिष्यांच्या वतीने नारायणमहाराज यांचे गुरुपूजन व दर्शन सोहळा पार पडला. रात्री ९.३० ते १० वाजता महाआरती झाली. १२.३० ते १ या काळात साजरी आरती झाली.