शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना वरदान केळीची जी-९

By admin | Updated: August 25, 2016 03:07 IST

केळी बागायती दिवसेंदिवस कमी होत असतांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीची जात बागायतदारांना वरदान ठरणारी आहे.

वसई : वाढते औद्यागिकरण आणि रोगराईमुळे वसईच्या केळी बागायती दिवसेंदिवस कमी होत असतांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीची जात बागायतदारांना वरदान ठरणारी आहे. शनिवार दि.२७ आॅगस्ट रोजी शनी मंदिर वाघोली, ट्रस्टच्यावतीने शेतकऱ्यांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. भरघोस पीक आणि रोगराईमुक्त पीक अशी या जातीची वैशिष्ट्ये आहेत.गेल्या काही वर्षात केळींवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी तिच्या लागवडीकडे पाठ फिरवायला लागले आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना पुन्हा केळीच्या शेतीकडे वळविणे गरजेचे होते. त्यासाठी उपयुक्त ठरणारी जी-९ ही जात रोगराईपासून मुक्त व कमी उंचीची असून एक सारख्या वाढीमुळे जास्त उत्पादन देते. या केळीच्या झाडांची लागवड वसईतील वातावरणास पूरक आहे.वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर व उपमहापौर उमेश नाईक यांच्या हस्ते वसईतील शेतकऱ्यांना या रोपांचे वाटप होणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक व मनपाचे नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर सध्या जी-९ टिश्यू कल्चर केळींची ५००० रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोफत वाटली जाणार आहेत. त्यांची लागवड कशी करावी, याबाबत मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी १ लाख केळीची रोपे वाटण्यात आली होती. (प्रतिनिधी)>सुकेळी हे एकेकाळी आपल्या वसईची ओळखकेळीच्या बागा आणि सुप्रसिद्ध सुकेळी हे एकेकाळी आपल्या वसईची ओळख होते. अनेक जातींच्या केळींची लागवड वसईकर शेतकरी वर्षानुवर्षे करीत आहेत. राजेळी, वेलची, आंबट वेलची, भूरकेळ, हिरव्या सालीची (बसराई/बसरी) केळी, बनकेळ, मूठेळी, तांबडी (तांबड्या सालीची) तसेच सध्या प्रचलीत असलेली हजारी केळींची लागवड वसईत माठ्या प्रमाणात होत असे. त्यापैकी मूठेळी ही केळीची जात आता वसईतून नामशेष झाली आहे. बनकेळ ही जातही आता दुर्मीळ होत चालली आहे.केतकीच्या सपाट्यात म्हसकेळचा बळीवसईतील या केळ्यांना मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होती. म्हसकेळ या जातीच्या केळी फार लोकप्रिय होत्या. पण काही वर्षांपूर्वी पर्णगुच्छ (केतकी) नावाचा रोग आल्यामुळे ही जात त्याला बळी पडली. वसईतील शेतकऱ्यांनी इतर जातीच्या केळी अजूनही टिकवून ठेवल्या आहेत. केळीच्या विविध उपयोगांमुळे केळीच्या झाडांना कल्पतरू म्हटलं जातं. परंतु सध्या केळीच उत्पादन घेण शेतकऱ्यांना जिकरीचं होऊन बसलेले असताना या नव्या जातींमुळे आता वसई तालुक्यातील केळी लागवड पुन्हा एकदा भरभराटीला येण्याची चिन्हे दिसत आहेत.