शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गुरुजींचा राडा !

By admin | Updated: August 24, 2015 01:24 IST

प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. अर्वाच्च शिवीगाळ करण्याबरोबरच खुर्ची तसेच चप्पल

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. अर्वाच्च शिवीगाळ करण्याबरोबरच खुर्ची तसेच चप्पल फेकाफेकीमुळे गुरुजींच्या सभेला आखाड्याचे स्वरूप आले होते. एका शिक्षकाला तर कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली़ शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७६वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते यांनी विषयपत्रिकेवरील पहिल्या विषयाचे वाचन सुरू केले. तर त्यांना रोखत मागील प्रोसिडिंगच्या सविस्तर वाचनाची मागणी विरोधकांनी केली, तर हा विषयच मंजूर करावा, असा आग्रह सत्तारूढ गटाने धरला. या गोंधळातच कुणीतरी खुर्ची फेकली आणि धुमश्चक्रीला सुरुवात झाली. कोण कोणाला मारते, हेच कळत नव्हते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांच्या समर्थकांना सभागृहातून बाहेर काढले. मागील पाच सभांचा अनुभव पाहता यावेळेला बॅँकेने पोलीस बंदोबस्त मागविला नव्हता. यावेळी मात्र तब्बल दोन तास गोंधळ सुरू होता, तरीही पोलिसांना पाचारण केले नाही. एका गटाचे समर्थक विटा व दगड घेऊनच व्यासपीठावर बसले होते. सोशल मीडियावर गुरुजींचा राडा पाहून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला. आपण शिक्षक आहोत, याचे भान अनेक मंडळींना नाही. जाणीवपूर्वक गोंधळ करून शिक्षकपेशाला गालबोट लावण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे.- राजमोहन पाटील, अध्यक्ष, शिक्षक बँकसभेतील राड्यास सत्तारूढ गटाचा पळपुटेपणाच जबाबदार आहे. आम्ही लोकशाहीमार्गाने समांतर सभा घेणार होतो; पण तिथेही गावगुंडांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.- प्रसाद पाटील, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष व बॅँकेचे संचालक