पिंपरी चिंचवड (पुणो) : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपालचे पुणो व पिंपरी-चिंचवड येथेही शिष्यगणांचे जाळे पसरलेले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योजक असलेल्या रामपाल शिष्याला अटक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
रोहतक (हरियाणा) येथील सतलोक आश्रमाशी संबंधित कामे, तसेच महाराष्ट्रातील शिष्यगणांचे नेटवर्क सांभाळणारे सहा आरोपी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यातील ‘ढाका’नामक एक आरोपी पिंपरीतील आहे.
मूळचा रोहतक येथील परंतु पिंपरीत वाहतूक व्यवसायात जम बसविलेला ढाका नामक शिष्य बाबा रामपालचा निकटवर्तीय आहे. बाबा रामपाल पुणो दौ:यावर यायचे तेव्हा ते आवजरून ढाका यांच्या निवासस्थानी हजेरी लावत. ढाका यांच्या गोदामांचे उद्घाटन रामपाल बाबाच्या हस्ते झाले आहे. ढाका यांना रोहतक आश्रमात अटक झाल्यामुळे औद्योगिक परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. देशातील विविध भागांतून अटक केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे, असे सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)