शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तोफा धडाडणार

By admin | Updated: February 5, 2017 01:56 IST

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली असून, आजच्या रविवारी राजकीय पक्षांच्या प्रचार-प्रसाराला आणखी वेग येणार आहे. विशेषत: मतदानाच्या

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली असून, आजच्या रविवारी राजकीय पक्षांच्या प्रचार-प्रसाराला आणखी वेग येणार आहे. विशेषत: मतदानाच्या तारेखपर्यंत दोनच रविवार उमेदवारांसमोर असल्याने, राजकीय पक्षांनी प्रचार-प्रसाराचे वेळापत्रक आखत, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दंड थोपटले आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या अनुक्रमे गिरगाव, मानखुर्द येथील सभांनी प्रचाराची सुरुवात केली असतानाच, आजच्या रविवारी मुंबई शहर आणि उपनगरातील पक्षीय उमेदवार आपल्या प्रचार-प्रसाराचा नारळ फोडणार आहेत. मुलुंड येथील १०४ मधील भाजपाचे उमेदवार प्रकाश गंगाधरे, राष्ट्रवादीचे चेंबूर येथील नीलेश भोसले, घाटकोपर येथील १३२ मधील काँग्रेसचे प्रवीण छेडा यांच्यासह शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव, स्नेहल आंबेकर या उमेदवारांसह वरळी, दादर, अंधेरी, दिंडोशीसह बोरीवली आणि मालाड-दहिसर येथील शिवसेनेच्या उमेदवारांनी रविवारचा मुहूर्त साधत, जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावर जोर दिला आहे. पूर्व उपनगरातही छेडा, गंगाधरे यांच्यासह शहरात नाना आंबोलेंसह उर्वरित उमेदवारांनी रविवारचा मुहूर्त साधत मतदारांच्या गाठीभेटीचे नियोजन केले आहे.भाजपाचे सर्व उमेदवार रविवारी दुपारी २ वाजता हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून, त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात पारदर्शी भष्टाचारमुक्त कारभाराची शपथ घेणार आहेत. याच मेळाव्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते भाजपाच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. शिवसेनेनेही प्रचारास सुरुवात केली असून, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ भांडुप आणि मुलुंड येथे ९ वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असून, ६ ते १८ फेब्रुवारीपर्यंत सेनेच्या चांदिवली, घाटकोपर, सायन, कांदिवली, चारकोप, अंधेरी, विलेपार्ले, वरळी, परळ, वडाळा, दादर, गोरेगाव, दिंडोशी, दहिसर, मागाठाणे आणि बीकेसी येथे सभा होणार आहेत. (प्रतिनिधी)७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार- राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार-प्रसार करण्यावर जोर आहे. इमारतींसह चाळीमधील मतदारांच्या गाठीभेटी, रॅली, चौकसभा आणि कार्यालयांचे उद्घाटन, अशा व्यस्त वेळापत्रकांनी महापालिकेची निवडणूक रंगणार आहे.- ७ फेब्रुवारी ही उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे. परिणामी, यादिवशी कोणता अपक्ष अथवा पक्षीय उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतो? याकडेही मुंबईकरांचे लक्ष असणार आहे. या दिवशी मुंबईच्या २२७ वॉर्डमधील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणुकीला आणखीच रंग चढणार आहे.