शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात राज्य असहिष्णुतेची जन्मभूमी!

By admin | Updated: November 27, 2015 03:15 IST

गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे

कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असे मत गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांनी गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा महाराष्ट्रात जत्था आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली.सिनेनिर्माते परेश नायक म्हणाले, ‘गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ या कालावधीत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे असहिष्णुतेच्या विरोधात विचारवंत विरोध करीत आहेत. हत्या झालेल्या नेत्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.’डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे, हे चिंताजनक आहे.’ यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विसपुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर(मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संघ, भाजपाकडून असहिष्णुतेला प्रोत्साहनगुजरात नवनिर्माण आंदोलनाच संस्थापक मनीष जानी म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. असहिष्णुतेच्या प्रयोगशाळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा प्रोत्साहन देत आहेत.’दबाव नसलेला एक मिनिट नाही...शासनाकडून मिळालेला पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर, शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनिटही नाही. जो भितो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. दबावाला बळी न पडता, आमचे काम सुरू आहे.