राजेश निस्ताने / यवतमाळग्रामीण पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या भूजल सर्वेक्षण विभागाचा अमरावतीच नव्हे, तर राज्यभरातील कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. या विभागातील सहसंचालकांच्या दोन, तर उपसंचालकांच्या तब्बल सहा जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम विभागाच्या कामकाजावर होत आहे.भूगर्भातील पाणीसाठा किती, याची आकडेवारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे असते. कोणत्या भागात बोअरवेल, विहिरी खोदाव्यात अथवा खोदू नये, याचा निर्णय हा विभाग घेतो. ग्रामपंचायतींना निधी देणे, पाणीपुरवठा संबंधित मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही या विभागावर आहे. जलयुक्त शिवारच्या जिल्हा सर्व्हेअर समितीतही हा विभाग सहभागी आहे. सीईओ व वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या स्वाक्षरीनेच ग्रामपंचायतींना धनादेश जारी केले जातात.
‘भूजल सर्वेक्षण’ कनिष्ठांच्या भरवशावर
By admin | Updated: February 16, 2017 04:40 IST