शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेला ग्रीन निकालाला रेड सिग्नल

By admin | Updated: August 27, 2014 00:55 IST

रवेशबंदीच्या यादीमधल्या ६३ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी विशिष्ट अटींसह हिरवी झेंडी दाखविली.

हायकोर्ट : प्रवेशबंदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रकरणनागपूर : प्रवेशबंदीच्या यादीमधल्या ६३ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी विशिष्ट अटींसह हिरवी झेंडी दाखविली. न्यायालयाच्या निर्णयानुसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेता येईल, पण न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय परीक्षेचा निकाल जाहीर करता येणार नाही. याशिवाय ही विशेष परीक्षा प्रा. सुनील मिश्रा यांच्या रिट याचिकेवरील (२४४८/२०१३)अंतिम निर्णयाच्या आधीन राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्तीद्वय अशोक भंगाळे व चंद्रकांत भडंग यांनी हा निर्णय देऊन याचिकेवरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर निश्तिच केली.विशेष परीक्षेला बसणारे सर्व विद्यार्थी गेल्या शैक्षणिक सत्रातील आहेत. विद्यापीठाने ९ एप्रिल २०१३ रोजी एकही मान्यताप्राप्त पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांची यादी न्यायालयासमक्ष सादर केली होती. या महाविद्यालयांमध्ये दिलेले प्रवेश पुढील आदेशाधीन राहतील व त्यासाठी प्रतिवादी जबाबदार राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. यानंतर विद्यापीठाने ३३८ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी लादली होती. काही दिवसांनी अनेक नावे वगळून २५० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली. यातील ६३ महाविद्यालयांतील ६६१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश वैध असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. न्यायालयाने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास कधीच मनाई केली नसल्याने व राज्य शासनाने विशेष परीक्षा घेण्याचे आदेश दिल्याने काही दिवसांपूर्वी विद्यापीठ सक्रिय झाले. विद्यापीठाने विशेष परीक्षेचा अध्यादेश पारित करून कुलपतींकडे पाठविला. कुलपतींनी अध्यादेशाला मान्यता दिली. परिणामी विशेष परीक्षेसाठी येत्या २८ आॅगस्टपासून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष परीक्षेसाठी ६६१६ मधून फार कमी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष परीक्षेला न्यायालयाने अद्याप परवानगी दिली नव्हती. हा मुद्दा आता तात्पुरता निकाली निघाला आहे. (प्रतिनिधी)