शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बाजीराव-मस्तानी’ला हिरवा कंदील

By admin | Updated: December 19, 2015 00:22 IST

संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव - मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र संजय लीला भन्साली, रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, दीपिका

मुंबई : संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव - मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र संजय लीला भन्साली, रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.राज्य सरकार, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष, निर्माते-दिग्दर्शन संजय लीला भन्साली, अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण हे या याचिकेत प्रतिवादी आहेत. यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने दिले.पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या चित्रपटाच्या ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,या गाण्यांद्वारे बाजीराव पेशवे आणि त्यांच्या पत्नींबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.काशीबाई आणि मस्तानी कधीच एकत्र नाचल्या नाहीत. मात्र या चित्रपटात त्यांना एकत्र नाचताना दाखवले आहे. लोकांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास सादर करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रीय स्त्रियांचाच एकप्रकारे अनादर आहे. एका गौरवशाली इतिहासाचा अपमान करण्यात आल्याचेही याचिकेमध्ये म्हटले आहे. चित्रपटामधील काही घटना, दृश्ये काल्पनिक दाखवण्यात आली आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्याने खंडपीठाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची दादमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना मात्र एक प्रेक्षक म्हणून मला ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमा आवडला. आता जो काही वाद सुरू आहे, त्यादृष्टीने मी तुलना केलेली नाही. फक्त मनोरंजन म्हणून मी त्या चित्रपटाकडे पाहिले. जर तुम्ही इतिहास म्हणून विचारत असाल तर माझे असे कोणतेही मत या सिनेमाबद्दल नाही, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या भूमिकेमुळे मात्र भाजपा कार्यकर्त्यांची कोंडी होऊ शकते.