शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महामानवांनी देशाला दिशा दिली

By admin | Updated: August 11, 2015 01:18 IST

शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; शिवाय त्यांनी

नागपूर : शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; शिवाय त्यांनी वंचित समाजाला समानतेचा अधिकार मिळवून दिला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने रविवारी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले तर, प्रमुख अतिथी म्हणून केंंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्काराचे विशेष संस्था व व्यक्तींना वितरण करण्यात आले.राज्यातील वंचितांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्तींची जबाबदारी अधिक वाढली आहे. या संस्था व व्यक्ती समाजापुढे आदर्श ठरणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर लवकरच भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच लंडन स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अण्णा भाऊ साठे महामंडळात गैरव्यवहार करणाऱ्यांना कारागृहात पाठविणार असल्याचे दिलीप कांबळे म्हणाले.पुरस्काराचे मानकरी मुंबई येथील भिक्कू संघाज युनाटेड बुद्धिस्ट मिशन, सर्वोदय बुद्धविहार, डेक्कन एज्युकेशन सोसायटी - पुणे, प्रबोधिनी ट्रस्ट - नाशिक, वनवासी सेवा समिती - जामोद, विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन रिसर्च सेंटर - औरंगाबाद व कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था - नागपूर यांना शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी -नागपूर, अण्णा भाऊ साठे ह्युमन अ‍ॅण्ड कल्चरल सोसायटी -नांदेड, जोशाबा शिक्षण प्रसारक मंडळ -नाशिक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे युवक मंडळ -कोल्हापूर व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लोककला मंडळ -किल्लारी यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार, नांदेड येथील महाराष्ट्र चर्मकार परिषद व अवधूत को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांना संत रविदास पुरस्कार देण्यात आला.वैयक्तिक पुरस्कारामध्ये यशवंत रामचंद्र भिसे -पुणे, दत्ताबापू काळूके -बीड, लहानू नाडे -औरंगाबाद, रामचंद्रप्पा गायकवाड -उस्मानाबाद, मुक्ताबाई दुंडे -गोंदिया, बाजीराव शिंदे -पुणे, प्रभाकर शिरसाठ -मुंबई, उत्तम लहुबंदे -मुंबई, साखराबाई बगाडे -ठाणे, युवराज मगदुम -ठाणे, रमेश वैरागर -नाशिक, संभाजी कांबळे -नाशिक, श्रीकांत साठे -अहमदनगर, रामचंद्र पाखरे -जळगाव, प्रल्हाद कांबळे -पुणे, शांताराम जोगदंड -पुणे, संजय शेजवळ -औरंगाबाद, यशोदाबाई कोरडे -हिंगोली, कृष्णा वानखेडे -नागपूर, शंकर वानखेडे -नागपूर, दिगंबर घंटेवाड -नांदेड, छायाबाई घोरपडे -लातूर व वामन श्रीपद आमटे -चंद्रपूर यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच बाळकृष्ण कांबळे -ठाणे, सरोज बिचुरे -मुंबई, भरत कारंडे -पुणे, ईश्वरदास सोनवणे -भंडारा व लीलाधर कानोडे -नागपूर यांना संत रविदास पुरस्कार व मुंबई येथील नटवरलाल रघुनाथ खरे यांना कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार प्रदान केला.