सिंधुदुर्गनगरी : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक, नोंदणीकृत विवाहासाठी आवश्यक मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडप्यासाठी १० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिलीशुभमंगल सामूहिक योजनेची व्याप्ती वाढवून ती केवळ शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी न ठेवता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग वगळता एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निराधार, परित्यक्त्या आणि विधवा महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरिता अटी, शर्थीनुसार अनुदान मंजूर करण्यात येते. (प्रतिनिधी)१२ हजारांचे अनुदान मंजूरशुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्याची योजना, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येईल. स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे २ हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान शासनामार्फत देण्यात येत असून या अनुदानातून विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च स्वयंसेवी संस्था करतील. या दोन्ही बाबी धरुन रुपये १२ हजार एवढे अनुदान मंजूर करण्यात येईल.या योजनेसाठी अटी व शर्थी पुढीलप्रमाणे - वधू व वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. विवाहावेळी वधूचे वय १८ वर्षे व वराचे वय २१ वर्षे पूर्ण असावे. वधूवरांना प्रथम विवाहासाठी हे अनुदान देय असेल. वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुदान देय असेल. लाभार्थी हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सातबारा उतारा, शेतकरी, शेतमजूर असल्याचा पुरावा म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला. लाभार्थ्यांच्या पालकाचे एकूण उत्पन्न रुपये १ लाखाच्या आत असावे. या योजनेंतर्गत अनुदान मंजुरी मिळण्यासाठी अजा, अजमाती, विज, भज, विमाप्र या प्रवगार्तील दाम्पत्ये पात्र राहणार नाहीत. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दांपत्य कुटुंब यांचेकडून झालेला नसावा. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान ५ व जास्तीत जास्त १०० दाम्पत्य असणे आवश्यक आहे.
शेतकरी मुलीच्या विवाहास अनुदान
By admin | Updated: June 30, 2015 00:23 IST