शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नातीवर बलात्कार करणा-या आजोबाच्या आवळल्या मुसक्या

By admin | Updated: April 6, 2017 08:35 IST

आजोबानंच स्वतःच्या नातीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आपल्या 56 वर्षांच्या आजोबांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केलीय.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - आजोबानंच स्वतःच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आपल्या 56 वर्षांच्या आजोबांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. होणा-या अत्याचाराची कुठेही वाच्यता करायची नाही असे सांगत आजोबांनी जिवे मारण्याची धमकी दिली व परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. आरोपी आजोबा हा गुजरातमध्ये वॉचमॅनचं काम करतो तर पीडित मुलीचे आईवडील हे मुंबई मजुरीचं काम करत असल्याचे समजते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईवडील तिला घेऊन कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर पीडित मुलगी 2 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर कुटुंबीयांनी मुलीची विचाकपूस केल्यानंतर तिनं आजोबांनी अत्याचार केल्याचे आरोप केले. यानंतर तिच्या आजोबांविरोधात चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली.
 
चारकोप पोलिसांव्यतिरिक्त क्राईम ब्रांचचं युनिट 11 देखील या प्रकरणाची तपासणी करत होते. आरोपी आजोबा गुजरातमध्ये असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली. त्याला मुंबईत बोलवण्यासाठी तपास पथकाने पीडित मुलीच्या शेजा-यांची मदत घेतली आणि आरोपी मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 
 
असा जाळ्यात अडकला आरोपी
दरम्यान, तपासणीदरम्यान सुरुवातीला पीडित मुलीनं दोन जणांनी बेशुद्ध करुन निर्वस्त्र करत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती क्राईम ब्रांचला दिली होती. पण तिच्या बोलण्यावर पोलिसांना विश्वास बसला नाही. त्यामुळे तिच्याकडून आणखी माहिती काढून घेण्यासाठी एका आरोपीला अटक केल्याचं पोलिसांनी तिला सांगितलं. त्यावर पीडितेच्या तोंडून "काय, आजोबांना पकडण्यात आलं?"असे शब्द आपणहून निघाले. त्यावेळी पोलिसांना ख-या आरोपीची माहिती हाती लागली. 
 
क्राईम ब्रांचनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांनी शेजा-यांना आरोपी आजोबासोबत संपर्क साधून पीडित मुलीची आई आजारी असल्याचे सांगायला सांगितले. पत्नीचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या नातीचे वडील हॉस्पिटलमध्ये असतात, त्यामुळे मुलगी एकटीच घरात असते. तिचा सांभाळ करण्यासाठी कुणीही नाही. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्यात आरोपी आजोबा अलगद सापडला. व पोलिसांनी त्याला गजाआड केलं.