शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By admin | Updated: October 8, 2016 01:02 IST

तरुणांना नोकरी देत नसल्याच्या निषेधार्थ उपसरपंच , सदस्य व तरुणांनी उर्से ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळे ठोकले.

उर्से : ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्यांमध्ये गावातील तरुणांना नोकरी देत नसल्याच्या निषेधार्थ उपसरपंच , सदस्य व तरुणांनी उर्से ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळे ठोकले. कंपन्यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा तरुणांनी दिला असून, जोपर्यंत मुलांना कामावर घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत बंद ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांत बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले.अनेक दिवसांपासून गावातील बेरोजगार मुले फिनोलेक्स व फिनिक्स या कंपनीत कामावर घ्यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी करीत होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने फिनिक्स या कंपनीकडे ५ व ६ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र, दोन महिने होऊनही कंपनीने कोणतीही दखल घेतली नसल्याने तरुण संतप्त झाले आहेत. बेरोजगारी आणि ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कमी पडतोय का? याचा राग मनात धरून तरुणांनी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. जोपर्यंत गावातील मुले कामाला घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे ग्रामपंचायत कामगार आणि ग्रामसेवकांना बाहेरच उभे राहावे लागले. सरपंच ऊर्मिला धामणकर, उपसरपंच उत्तम पोटवडे, ग्रामपंचायत सदस्य भरत कारके, सुलतान मुलाणी, अमर शिंदे, चंद्रकात धामणकर, अविनाश कारके, माजी सरपंच दिगंबर राऊत , भास्कर ठाकूर, सतीश कारके, तंटामुक्त अध्यक्ष प्रल्हाद पिसाळ, राजू पठाण , गुलाब धामणकर, जालिंधर धामणकर, भाऊ ठाकूर, गुरुदास दौंड, सचिन ठाकूर, अविनाश शिंदे, किरण राऊत, समीर शिंदे, आकाश धामणकर, विजय कारके, लालू दौंड, देविदास सावंत, रमेश गायकवाड, बंडू धामणकर व गावातील तरुणांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. (वार्ताहर)>तळेगावात बैठक : ग्रामस्थांशी चर्चा करणार ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकल्यानंतर तळेगाव पोलीस स्टेशन येथे कंपनीचे अधिकारी, पोलीस निरक्षक वसंत बाबर व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. या वेळी दोन दिवसांत बैठक ग्रामपंचायतीबरोबर घेऊन चर्चा करू, असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फतच तरुणांना कामाला घ्यावे, अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे. याबाबत उपसरपंच पोटवडे म्हणाले, कंपनी कुठल्याही प्रकारची दाद देत नसल्याने आम्हाला टाळे ठोकावे लागले. कंपनीने लवकरात लवकर मुलांना कामावर घ्यावे, अशी आमची मागणी आहे.