शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर गोविंदांचा रोष

By admin | Updated: August 23, 2016 01:52 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवातील उत्साहच मावळला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवातील उत्साहच मावळला आहे. गोविंदा पथके आणि दहीहंडी समन्वय समितीने वेगवेगळ््या प्रकारे धडपड करून निर्णयात तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदरी निराशा आल्यानंतर या गोविंदांनी आपल्या मनातील खदखद सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे. सध्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या या पोस्ट्सची बरीच चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाने थरांच्या उंचीवर २० फुटांची मर्यादा घातली, तर १८ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग उत्सवात नसेल, याविषयी निर्बंध घातले. फेसबुकवर विविध गोविंदा पथकांनी दहीहंडीचे थर लावलेल्या छायाचित्रांवर विविध संदेश देऊन पोस्ट्स व्हायरल होत आहे. यात विशेषत: शहर-उपनगर आणि ठाण्यातील गोविंदा पथकांचा अधिक समावेश आहे. शिवाय, दहीहंडी निर्णयाच्या वादात पाठिंबा दिलेल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थन करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियावर चर्चा आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट्सच्या माध्यमातून गोविंदाना एकत्र करीत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. रविवारी शिवाजी पार्कात गोविंदांनी केलेल्या निषेध रॅलीद्वारे याची प्रचिती आली होती.>कितीही लावा नियम आणि कितीही घाला बंदी, खेळल्याशिवाय राहणार नाही आमची दहीहंडीसरकारने किया है गोविंदा का खेल, कितनी भी हो कडी परीक्षा नही होंगे फेलआपला गोविंदा करून आला परदेश वारी, मग का त्याच्या वर इतकी बंधने सारीकितीही खेचा गोविंदाचे पाय, थर लावल्याशिवाय राहणार नायशिवबाचे मावळे आम्ही सारे, थंड नाही बसणार, ८-९ थरावर पुन्हा जोशात चढणारअगर आज एक होगा गोविंदा, हमारा त्योहार सदा रहेगा जिंदाकागदाला चिटकवायला गम लागतो, गोविंदा खेळायला अंगात दम लागतो