शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

गोविंदांचा सविनय कायदेभंग

By admin | Updated: August 26, 2016 04:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ‘मनोरे’ शहर व उपनगरातील बहुतांश मोठ्या दहीहंडी आयोजक व मंडळांनी पोलिसांच्या साक्षीने कोसळविले.

मुंबई : दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ‘मनोरे’ शहर व उपनगरातील बहुतांश मोठ्या दहीहंडी आयोजक व मंडळांनी पोलिसांच्या साक्षीने कोसळविले. वीस फुटापर्यंत मनोरे उभारण्याचे व १८ वर्षांखालील मुलांना सहभागी न करण्याच्या अटीचे सर्रासपणे उल्लंघन झाले. अनेकांनी पाच ते आठ थर उभे करताना त्यात लहान मुलांनाही सहभागी करुन घेतले होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई केली नसलीतरी त्याचे व्हिडीओ चित्रण करुन घेतले आहे. त्याची पडताळणी करुन येत्या काही दिवसांत त्याबाबत गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेंबूरमध्ये गोविंदा मंडळांने आठ थर लावून सलामी दिल्याने त्यांना पुन्हा तितके थर लावण्यास पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे काहीवेळ पोलीस व कार्यकर्त्यांत तणाव निर्माण झाला होता. काही मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असलेतरी अनेकांनी त्याचा सन्मान करीत दहीहंडी उत्साहात साजरी केली. पोलिसांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘मनसे’सह काही मंडळांच्या आयोजकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतल्याने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी सर्व दहीहंडी मंडळाचे व्हिडीओ चित्रण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहर व उपनगरातील ३ हजार ३८७ मंडळांच्या दहीहंडी फोडण्याच्या घटनेचे चित्रण करण्यात आले. ज्याठिकाणी कॅमेरे नव्हते, त्याठिकाणी पोलिसांनी मोबाईलमध्ये शूटिंग केले. त्याची पडताळणी करुन कोणत्या कलमानुसार कारवाई करायची, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त अशोक दुधे यांनीसांगितले. या सोहळ्यामध्ये कसलेही विघ्न येवू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस रस्त्यावर तैनात होते. (प्रतिनिधी)>नवी मुंबईत उत्सव घटलानवी मुंबई परीमंडळ एक परिसरात ४० दहीहंडी तर परीमंडळ दोन परिसरात १४० दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. न्यायालयाच्या निर्बधामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी पथक फिरकलेच नाही. खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आदी ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडया उभारल्या होत्या.