शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा पथके आणि आयोजक गेले कुणीकडे?

By admin | Updated: July 14, 2017 06:02 IST

न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने दहीहंडी उत्सवावर गेल्या काही वर्षांत विरजण पडले आहे

स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने दहीहंडी उत्सवावर गेल्या काही वर्षांत विरजण पडले आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदा पथकांचे न्यायालयाकडून या उत्सवासंदर्भात कान टोचले जातात. यंदाही ही कोर्टवारी सुुरू झालेली आहे. या प्रकरणाच्या याचिकाकर्त्या यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे माहिती अधिकाराद्वारे गोविंदा पथके आणि आयोजकांविषयी माहिती मागितली होती. मात्र, त्याला उत्तर देत याविषयी माहितीच संकलित करत नाही, असे उत्तर धर्मादाय आयुक्तालयाने दिले आहे. त्यामुळे आता दहीहंडी उत्सवात सहभागी होणारी गोविंदा पथके आणि आयोजक गेले कुणीकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या या प्रकरणाची पुढील सुनावणी १ आॅगस्टला आहे. मात्र, या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी मुंबई आणि ठाण्यात नेमकी किती गोंविदा पथके आणि आयोजक आहेत? याचा तपशील माहिती अधिकाराद्वारे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी मागितला होता; परंतु मुंबई आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणच्या धर्मादाय आयुक्तालयाने ह्यया कार्यालयात ही माहिती संकलित करत नसल्याचे सांगतह्ण हात वर केले आहेत.बालगोविंदावरील बंदी आणि उंचीची मर्यादा या निर्बंधामुळे जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथक आणि राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. याविषयी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला सुरक्षाविषयक तरतुदींचा लेखी अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि आर. भानुशाली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. या प्रकरणी माहिती अधिकारांतर्गत तपशील मागितला होता. धर्मादाय आयुक्तालयाचे प्रत्युत्तर गंभीरपणे घेण्याची गरज आहे. त्यांच्याकडे पथक व आयोजकांची नोंदणी असणे अत्यावश्यक आहे. याचा विचार करून राज्य शासनाने त्वरित गोंविदा पथक आणि आयोजकांच्या अधिकृत नोंदणीची सक्ती करावी, अशी मागणी याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली.>२०१४मध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवातील थर २० फुटांपर्यंत असावेत, असा आदेश दिला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून दहीहंडी उत्सव जवळ आला की मुख्यमंत्री न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी आम्ही मार्ग काढू, असे आश्वासन देत पथकांची दिशाभूल करीत आहेत. जर यंदाच्या दहीहंडी उत्सवात नियम मोडल्यास, कोणाचा मृत्यू झाल्यास अथवा कुणाला गंभीर दुखापत झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवमान याचिका दाखल करणार आहोत. - स्वाती पाटील, याचिकाकर्त्या