शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरेंवर खुनी हल्ला

By admin | Updated: February 17, 2015 02:46 IST

गोविंद पंढरीनाथ पानसरे (८१) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला.

महाराष्ट्र सुन्न : गोळीबारात पत्नीही जखमीकोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक, कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (८१) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे यांच्या पत्नीसुद्धा जखमी झाल्या. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. ही घटना पानसरे यांच्या निवासस्थानापासून सत्तर फुटांवर घडली. कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत या घटनेमागे कोणत्या प्रतिगामी शक्ती आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नसताना त्याच विचारांचे जाहीरपणे समर्थन करणारे व त्यांच्या चळवळीला बळ देणारे पुरोगामी नेते कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (वय ६७) सकाळी नित्यनियमाप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी ९.२० वाजता ते घराकडे परतत असतानाच दोघा हल्लेखोरांनी पानसरे यांच्यावर पिस्तूलमधून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी पानसरे यांच्या मानेला, दुसरी काखेत तर तिसरी त्यांच्या उजव्या पायाला लागली. या वेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या पत्नी खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पानसरे पती-पत्नी रस्त्यावरच कोसळले. तोपर्यंत घरातून पानसरे यांच्या स्नुषा मेघा, नातू मल्हार व कबीर, तसेच त्यांचे एक नातेवाईक मुकुंद कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पानसरे दाम्पत्यांना नजीकच्या अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कॉ. पानसरे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना तत्काळ रक्त चढविण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला तसेच त्यांच्या हृदयाचे स्पंदन तसेच नाडीचे ठोके कमी होत होते. तेही योग्य उपचारांनी नॉर्मल करण्यात यश मिळविले. त्यानंतर पानसरे पती-पत्नींवर एकाचवेळी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. कॉ. पानसरे यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे, अशी माहिती अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. उल्हास दामले यांनी दिली. (प्रतिनिधी)पाच जण ताब्यातस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुपारी इचलकरंजीतून पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या मनीष नागोरीसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू असून, पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत. नागोरीला यापूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हल्ल्याचे कारण ‘ते’ भाषण?ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. १४) पानसरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते म्हणाले, ज्यांच्यामुळे गांधीजींचा खून झाला त्याच विचारसरणीच्या लोकांनी त्यांचा जयजयकार सुरू केला आहे. नथुराम गोडसेला फाशी दिली तो दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. पानसरेंच्या या भाषणाचा व आजच्या हल्ल्याचा संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.चळवळीतील नेत्यांवरील हल्ल्यांचा इतिहास२० आॅगस्ट २०१३... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला.१३ जानेवारी २०१०... माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला.१६ जानेवारी १९९७... कामगार चळवळीतील नेते दत्ता सामंत यांच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची जीवनयात्रा संपविली.५ जून १९७०... कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि कामगार चळवळीतील नेते कृष्णा देसाई यांची मुंबईत हत्या.