शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले

By admin | Updated: July 11, 2015 01:44 IST

वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम

पुणे : वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखीचे दर्शन न घेताच पुण्यातून मुंबईला परतावे लागले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी म्हणूनच राज्यपाल आज खास पुण्यात आले होते. मात्र या आंदोलनामुळे त्यांना दर्शनाला मुकावे लागले.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी राज्यपाल संगमवाडीमध्ये जाणार होते. राज्यपालांच्या कार्यालयाकडून तसा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.याबाबत राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्यपालांना वारकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. वारकऱ्यांना त्रास होणार असेल तर ते आपल्याला आवडणार नाही अशी भूमिका घेतली.पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट आषाढी यात्रेच्या काळात वारकऱ्यांसाठी १५ दिवस खुले ठेवावे या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज अशा दोन्ही पालख्यांबरोबर असलेल्या वारकऱ्यांनी संगमवाडी येथे आंदोलन सुरू केले. चंद्रभागा नदीच्या या परिसराचा वापर करण्यास अलीकडेच न्यायालयाने मनाई केली आहे. ही मनाई उठवावी, त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करावा, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करीत होते. मात्र या चर्चेला यश आले नाही.------------आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणाऱ्या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते. वारकऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे. -------------पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या लावू द्याव्यात, या मागणीसाठी वारकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ थांबविला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.च्संगमवाडी येथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी विसाव्यास थांबलेली असताना अचानकपणे वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावे लागले. एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवरून चंद्रभागा नदीपात्रात राहुट्या लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली. च्राज्य सरकार आमची बाजू न्यायालयात मांडून त्यात मार्ग काढत नाही तोपर्यंत रथाला पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. वारीतील किमान १८ दिवस तरी हे निर्बंध उठवायला हवेत. यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातदाद मागावी, असे वारकरीसेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार म्हणाले.च्या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. तसेच शिवतारे यांनी चोपदार यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शनिवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे अश्वासन शिवतारे यांनी दिले.(प्रतिनिधी)