शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकसाठीही शासनाचा हात आखडता

By admin | Updated: July 1, 2016 01:45 IST

शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याने शासनाने ठिबकसिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत ‘प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना’ आखली;

संदीप चाफेकर,

यवत- शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याने शासनाने ठिबकसिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत ‘प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना’ आखली; मात्र निधीअभावी येथेही शासनाने आखडता हात घेतला असून, अनुदानाअभावी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव परत करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाने शिल्लक राहिलेले प्रस्ताव संबंधित शेतकऱ्यांना परत करा, असे आदेश सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एकीकडे शासन ठिबकवर शेती करा, असे सांगत असताना निधीचे कारण पुढे करून प्रस्ताव परत करीत असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजनेसाठी ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाच्या वतीने दिले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाकडे रीतसर यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यात ७८५६ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल केले होते. यातील १६५६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव यासाठी अपात्र ठरल्याने बाद करण्यात आले आहेत. तर, ६२०० प्रस्ताव यासाठी पात्र होते. मात्र, यातील केवळ ३७२४ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. उर्वरित २४७६ पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव निधी उपलब्ध नसल्याने परत पाठविण्याची वेळ कृषी विभागावर आली आहे.सदर योजनेसाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल करावे लागतात. अगोदरच जास्तीचे प्रस्ताव आल्याने नोव्हेंबर २०१५ पासून आॅनलाईन प्रस्ताव स्वीकारणेदेखील कृषी विभागाने बंद केले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सदर योजनेत प्रस्ताव दाखल न करता आल्याने त्यांची संख्यादेखील मोठी आहे.पुणे जिल्हा कृषी अधीक्षकांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुका अधिकाऱ्यांना २ जून २०१६ रोजी एका पत्रद्वारे अनुदानअभावी शिल्लक राहिलेले प्रस्ताव संबंधित लाभर्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशात ज्या प्रस्तावांना पूर्व संमती दिली होती, तथापि विहीत वेळेत (१ महिन्यात ) प्राप्त न झाल्याने अनुदानासाठी शिफारस केली नसल्यास अशा प्रस्तावांचे पूर्व संमती आदेश रद्द करून प्रस्ताव परत करण्यास सांगितले आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत अनुदान नसताना प्रस्ताव कार्यालयांनी स्वीकारू नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. >यंदा अपेक्षेपेक्षा जास्त प्रस्ताव : अनेक शेतकरी योजनेपासून वंचितपुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या लभांशापेक्षा जास्त आलेले प्रस्ताव परत करण्यात आले आहे. निधी उपलब्ध नसल्याने सदर प्रस्ताव परत पाठविण्यात आले असून, आॅनलाईन प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर ज्यांचे प्रस्ताव अगोदर आले अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. पाण्याची कमतरता भासू लागल्याने शेतकरीवर्गाचा कल ठिबक सिंचन करण्याकडे अचानकपणे वाढला आहे. यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा जास्त प्रस्ताव आल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.एकीकडे केंद्र शासनाने नोकरदारवर्गासाठी सातवा वेतन आयोग लागू करून लाखो रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तर, दुसरीकडे कमी पाण्यात शेती करण्यासाठी ठिबक सिंचन योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करत नसल्याने आता ग्रामीण भागातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.पुणे जिल्ह्यासाठी या योजनेसाठी यावर्षी १८ कोटींचा निधी मिळाला होता. आॅनलाईन अर्ज केला म्हणजे अनुदानासाठी पात्र ठरलो असा शेतकऱ्यांचा समज झाल्याने ते फेरे मारत आहेत. मात्र, जेवढे अनुदान मिळाले तेवढे वाटप केले आहे.