शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे संविधान विरोधी धोरण

By admin | Updated: May 21, 2016 01:24 IST

राज्य व केंद्र सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. शेतकरीविरोधी कायद्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले

बारामती : राज्य व केंद्र सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. शेतकरीविरोधी कायद्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ‘मनुस्मृती’प्रमाणे कार्यरत आहे. राज्यघटनेच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.पुरोगामी राज्यात प्रतिगामी कारभार फडणवीस सरकार करीत आहे. त्यांनी केलेले कायदे शेतकरीविरोधी आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली. आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठीच पुण्यातील विधान भवनावर दि. २७ मे रोजी संयुक्त धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सरकारने झोनबंदी उठवली. मात्र, दोन साखर कारखान्यांमधील अंतराच्या अटीमुळे शेतकऱ्यांना कारखानदार त्रास देतात. ही अट रद्द करावी. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना गोवंश हत्या बंदीचा कायदा आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाळलेल्या पशुधनाची किमती कमी झाल्या आहेत. दुष्काळाने पशुधन जगविणे जिकिरीचे झाले आहे. जनावरे विकता येत नाहीत. चारापाणी देता येत नाही, अशी स्थिती आहे. जनावरे कुपोषणाने मरायला लागली आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा. उच्च न्यायालयानेदेखील सरकारच्या या कायद्याविरोधात काही आक्षेप नोंदविले आहेत. उद्या कोंबड्यांच्या हत्येवरदेखील बंदी आणतील. शेतकऱ्यांना उपाशी मारणे हाच या मागचा उद्देश आहे. या कायद्यामुळे गाई पाळण्याचा धंदा तोट्यात आला आहे. चारा, पाण्याअभावी खंगून मेलेल्या पशुधनाची विल्हेवाट लावायची कुठे, याचे उत्तर सरकारकडे नाही. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला किंमत न मिळाल्यास शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्त करा. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा. शेतमालावरील निर्यातबंदी उठवा. कांदा खरेदी नाफेडमार्फत सुरू करावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. या वेळी सोशल डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी सांगितले की, गोवंश हत्याबंदी कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा देणार आहे. >शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाचा भाव एकरकमी मिळावा, याची तरतूद संविधानात केली आहे. मात्र, उसाच्या एफआरपीची किंमत तुकडे पाडून देण्याची नवी योजना राज्य शासनाने राबविली. तसेच, शेतकऱ्याच्या मालाची कोणतीही करकपात करू नये, असा नियम असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडूनच आडत, हमाली, तोलाईची पट्टी वजा केली जाते. शेतकरीहिताविरोधात काम करणारे सरकार ‘मनुस्मृती’ला मानणारे आहे.मनुस्मृतीनुसार शेतकरी शूद्र समजला जातो. तेच धोरण या सरकारने राज्यघटनेच्या विरोधात राबविले आहे. सध्या गोवंश हत्याबंदी केली.