शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार समाजमन जाणून घेणार

By admin | Updated: September 27, 2016 05:38 IST

मराठा आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबत होत असलेल्या मागणीवर मराठा समाजासह एकूणच समाजमन जाणून घेण्यासाठी मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी

मुंबई : मराठा आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबत होत असलेल्या मागणीवर मराठा समाजासह एकूणच समाजमन जाणून घेण्यासाठी मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांचे गट तयार करून थेट जनतेत जाण्यावर राज्य सरकार विचार करीत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच चर्चा करतील, असे स्पष्ट संकेत एका ज्येष्ठ मंत्र्याने आज पत्रकारांशी बोलताना दिले. या मंत्र्याने सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात या गटाने जावे आणि जनभावना जाणून घ्यावी, असा प्रयत्न असेल. त्यात मराठा समाजाबरोबरच इतर समाजाची मतेदेखील जाणून घेण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)मोर्चेकऱ्यांनी चर्चेसाठी नेते निवडावेतमराठा समाजाचे प्रचंड मोर्चे सध्या निघत आहेत. या मोर्चांचे नेमके नेतृत्व समोर येत नसल्याने कोणासोबत चर्चा करावी, याबाबत सरकार संभ्रमात आहे. मोर्चेकऱ्यांनी आपल्यातून काही नेते चर्चेसाठी निवडावेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. तसे झाले तर मराठा समाजाच्या मागण्यांविषयी चर्चा कोणाशी करायची हे स्पष्ट होईल, असे मत या मंत्र्यांनी व्यक्त केले. मंत्री आणि विरोधी पक्षांचे गट जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन जनभावना जाणून घेतील याचा अर्थ मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी सरकार चर्चा करणार नाही, असे मुळीच नाही. या मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांशी निश्चितपणे चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या पदास अजिबात धोका नाहीदेवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणताही धोका नसल्याचे आणि पक्षात त्यांना बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्वत: मराठा समाजाचे असलेल्या या मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठा समाजाचे मोर्चे हे फडणवीस वा राज्य सरकारच्या विरोधात नाहीत. शिवाय, मुख्यमंत्र्यांना हटविण्याची कोणाचीही मागणी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.आरक्षणाबरोबरच इतर उपायदेखील करणारमराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देणारच, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. तथापि, सकल मराठा समाजाच्या कल्याणासाठी इतरही उपाययोजना राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने असलेल्या आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा याच उपाययोजनेचा भाग आहे. याशिवाय, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती, या समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.