शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराचे श्रेय सरकारने लाटू नये

By admin | Updated: October 8, 2016 04:13 IST

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

अमरावती : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई शत्रूला वेगळा संदेश देणारी आहे. ‘उरी’च्या बदल्याचे श्रेय खऱ्या अर्थाने लष्कराचे आहे. परंतु या कारवाईचा मोदी सरकारने गवगवा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.अमरावती येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘संपुआ’ सरकारच्या काळात चारवेळा ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यात आले, पण देशहित लक्षात घेऊन त्याचे ‘मार्केटिंग’ आम्ही केले नाही. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे राजकीय फायद्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि भाजपाची मंडळी करीत आहेत. (प्रतिनिधी)>तामिळनाडूत मिळू शकते, तर महाराष्ट्रात का नाही?तामिळनाडूत ७४ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते, तर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देताना हे निकष का लावले जात नाहीत, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. आरक्षणाची मागणी करताना यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मराठ्यांना आरक्षण देताना दलित, आदिवासी, ओबीसी व इतर समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यात आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या!कोपर्डी येथील एका युवतीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली. गुन्हेगाराला जात, पात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी पवारांनी या वेळी केली. भाजपाने मुस्लिमांना आरक्षण देण्यास नकार दिल्याबाबत त्यांनी चांगलाच समाचार घेतला.