शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पैशांसाठी जमिनी विकणार

By admin | Updated: September 21, 2016 05:39 IST

सरकारने आता मिठागाराच्या जमिनी विकणे आणि उड्डाणपुलांच्या खालच्या जमिनी भाडेतत्त्वावर देऊन पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- आर्थिक वर्षाच्या मध्येच व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर महसूल वाढविण्यासाठी सरकारने आता मिठागाराच्या जमिनी विकणे आणि उड्डाणपुलांच्या खालच्या जमिनी भाडेतत्त्वावर देऊन पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला विविध करांच्या माध्यमातून किती महसूल मिळतो याचा आढावा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. तेव्हा कराशिवाय मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. करेतर उत्पन्नाच्या माध्यमातून ३७ टक्के उत्पन्न मिळणारे राज्य म्हणून तेलंगणाचा पहिला नंबर आहे तर फक्त १९ टक्के उत्पन्न मिळवून महाराष्ट्र राज्यात सातव्या नंबरावर आहे. १९ टक्के म्हणजे राज्याच्या तिजोरीत कराशिवायच्या महसुलातून जवळपास ८ ते १० हजार कोटी रुपये मिळतात. हाच महसूल आता किमान १५ ते २० हजार कोटींपर्यंत कसा वाढेल याचे नियोजन केले जात आहे. महसूल वाढविण्यासाठी वित्तमंत्र्यांनी करेतर उत्पन्नाचा एक आराखडाच तयार करण्याचे आदेश दिले होते. >महसूल वाढीसाठीचे उपायवापरात नसलेल्या जमिनी तसेच मिठागाराच्या जमिनी विक्रीस काढणे.भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांची भाडेवाढ करणे.महत्त्वाचे रस्ते, सरकारी इमारतींच्या किनाऱ्यांच्या जागांचे जाहिरात हक्क विकून पैसे उभे करणेउड्डाणपुलाखालील मोकळ्या जागा अ‍ॅटो कंपन्यांना, डिस्प्लेसाठी तसेच पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर देऊन पैसे मिळवणार.महामार्ग, मेट्रो कॉरिडोअरच्या आजूबाजूच्या जागा व्यावसायिक तत्त्वासाठी आयटी, आयटीईएससारख्या कंपन्यांना कार्यालये करण्यासाठी भाडेतत्त्वावर देऊन महसुलात वाढ करणार; शिवाय महामार्गांभोवती असणाऱ्या मोक्याच्या जागी हॉटेल्स, हॉस्पिटल, सर्व्हिस अपार्टमेंट उभे करणार.कन्व्हेअन्शन सेंटर्स, थीम पार्क, गोडाऊन्स, सोलार पार्कस्ची उभारणी करून महसूल वाढवणार.