शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

लोंढे रोखण्यावरून सरकारचे घूमजाव

By admin | Updated: April 2, 2015 05:18 IST

मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या अंदाजपत्रकात आलेला मुद्दा

मुंबई : मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या अंदाजपत्रकात आलेला मुद्दा २००८ पासूनचा आहे आणि तो याही वेळी प्रकाशित झाला, असे सांगून सरकारने या मुद्द्यावरून घूमजाव केले. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी तरतूद करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने ३० मार्चच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विनिनियोजन विधेयक मंजूर करतेवेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत  लोकमतमधील वृत्त म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे, असे सांगितले. मात्र, भाजपाचे आ. आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता हे सांगण्याचे अर्थमंत्र्यांनी खुबीने टाळले. आ. शेलार यांनी घेतलेल्या ओक्षपाकडे लक्ष वेधले असता ‘शेलार यांनी काय भाषण केले ते मला माहित नाही. कदाचित हा विषय समजण्याची त्यांची गल्लत झाली असावी’, असा खुलासाही मुनगंटीवार यांनी केला. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात कार्यासन क्र. २९ अ मध्ये ‘मुंबईत परप्रांतियांचे येणारे लोंढे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत’ असा दहाव्या नंबरचा मुद्दा आहे. जर यासाठी आर्थिक तरतूदच नाही तर हा विषय बजेटच्या अंदाजपत्रकात कसा आला, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर अर्थमंत्र्यांचे म्हणणे असे की, कोणत्या डेस्कने या प्रश्नाचे उत्तर द्यायचे हे निश्चित करण्यासाठी तो उल्लेख आहे. जर अर्थमंत्र्यांचे म्हणणे ग्राह्ण धरले तर हा विषय अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात न येता तो ‘सामान्य विभागाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये’ यात यायला हवा होता, पण तसे घडलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)