शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने लपविली ‘जात’!

By admin | Updated: February 15, 2015 00:46 IST

देशभरात चर्चेचा विषय ठरलेली सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची माहिती जाहीर झाली असून सर्वेक्षणातून नोंदविलेली जातींची माहितीच मात्र सरकारने लपवून ठेवली आहे.

मिलिंदकुमार साळवेल्ल श्रीरामपूर (जि. अहमदनगर)देशभरात चर्चेचा विषय ठरलेली सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची माहिती जाहीर झाली असून सर्वेक्षणातून नोंदविलेली जातींची माहितीच मात्र सरकारने लपवून ठेवली आहे.स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातनिहाय जनगणना केली जात असल्याचा मोठा गवगवा झाला होता. जून ते डिसेंबर २०११ दरम्यान मुख्य जनगणनेनंतर दुसऱ्यांदा जनगणना करण्यात आली. त्याला ‘सामाजिक-आर्थिक व जातीनिहाय जनगणना’ असे नाव देण्यात आले होते. १ जानेवारी २०१५ रोजी प्रारुप याद्यांच्या माध्यमातून माहिती जाहीर झाली. त्यावर ३० जानेवारीपर्यंत दावे व आक्षेप स्वीकारण्यात आले. २१ फेब्रुवारीपर्यंत दावे व आक्षेप निकाली काढण्याची अंतिम मुदत आहे.श्रीरामपूर नगरपालिकेच्या सभागृहात प्रारुप याद्या नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रभागनिहाय ठेवण्यात आल्या होत्या. त्याची पाहणी केल्यावर त्यावर ‘जातनिहाय जनगणना’ असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात त्यात जातींचा उल्लेख नाही. यादीतील आठव्या क्रमांकाच्या रकान्यात ‘जात / जमात व इतर’ असा उल्लेख असला तरी त्यात जातींचा उल्लेखच नाही. त्या ऐवजी ‘अनुसूचित जाती, जमाती व इतर’ एवढाच त्रोटक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे प्रारुप याद्यांवर आक्षेप, हरकती घेण्यासाठी जातींची माहितीच नसल्याने त्यावर हरकती घ्यायच्या कशा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार याद्या पालिकेच्या सभागृहात हरकती, तक्रारी नोंदविण्यासाठी ठेवल्या होत्या. संबंधित माहितीचा विषय केंद्र सरकार व वरिष्ठ पातळीवरचा आहे.- संतोष खांडेकर,मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका़़़ही तर फसवणूकचजातनिहाय जनगणना होणार म्हणून अनेक नेत्यांनी, पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात जल्लोष केला. पण प्रत्यक्षात जनगणनेच्या याद्यांमध्ये जातींचा उल्लेखच नाही. सरकारने जाती लपवून सर्वच भारतीयांची, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची फसवणूकच केली आहे.- कृषीराज टकले, प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा सेवा संघ