शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक सुनावणीसाठी सरकारी वकिलांना ३५ हजार फी

By admin | Updated: October 20, 2016 05:47 IST

न्यायालयात दाखल खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकिलांना प्रत्येक दिवसाला सुनावणीसाठी ३५ हजार रुपये फी दिली जाणार

जमीर काझी,

मुंबई- कोपर्डीतील बालिका अत्याचार प्रकरणात, न्यायालयात दाखल खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकिलांना प्रत्येक दिवसाला सुनावणीसाठी ३५ हजार रुपये फी दिली जाणार आहे. तर या खटल्याच्या अनुषंगाने विचारविनिमयासाठी एका तासासाठी दहा हजारांचा मोबदला, तसेच हॉटेल लॉजिंग बोर्डिंगसाठी ५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. राज्यभर गाजलेल्या या घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. या हत्येप्रकरणी ७ आॅक्टोबरला अहमदनगर सत्र न्यायालयात सुमारे ३०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अ‍ॅड. निकम यांना दिला जाणारा मोबदला नुकताच निश्चित करण्यात आल्याचे, गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अहमदनगरमधील कोपर्डी येथील एका १४ वर्षांच्या मुलीवर १३ जुलैला बलात्कार करून अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेर या तिघांवर हत्या आणि बलात्काराच्या कलमाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्य हादरून गेले होते. त्याबाबत शासनाने आरोपींना फाशीची शिक्षा करण्याबरोबरच, अ‍ॅट्रॉसिटीच्या गैरवापराला पायबंद घालण्यासाठी, तसेच आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजासाठी देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावे, यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चाची कल्पना पुढे आली. सरकारने कोपर्डी प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची २७ जुलैला नियुक्ती जाहीर केली. कोपर्डीच्या बालिका अत्याचार व हत्याकांडाच्या ८६ दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींवर जवळपास ३०० पानी आरोपपत्र दाखल केले. मात्र, खटल्याच्या कामकाजासाठी अ‍ॅड. निकम यांना द्यावयाच्या शुल्काची निश्चिती झालेली नव्हती. त्यामुळे विधि व न्याय विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार, त्यांच्या फीचे दर निश्चित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रत्येक परिणामकारक सुनावणीसाठी अ‍ॅड. निकम यांना प्रत्येक दिवसाला ३५ हजार रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे, या खटल्याच्या अनुषंगाने तपास अधिकारी संबंधित घटकांसाठी चर्चा करण्यासाठी एका तासाला १० हजार रुपये आणि या कामासाठी त्यांना अहमदनगरमध्ये मुक्काम करावा लागल्यास, प्रत्येक दिवसाला ५ हजार रुपये शुल्क दिले जाईल. >‘दिवसाला तीन तास कामाची अट’कोपर्डीच्या खटल्याबाबत तपास अधिकाऱ्यांसाठी विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी अ‍ॅड. निकम यांना एका तासाला दहा हजार रुपये देणार आहेत. मात्र, एका दिवसांत जास्तीत जास्त ३ तास यासंबंधी कामाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठी एका दिवसांत अधिकाधिक ३० हजार रुपये सरकारला द्यावे लागतील. ‘पानसरे प्रकरणी ७५ हजार फी’पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापुरातील सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यात, सुनावणीच्या प्रती दिवसासाठी विशेष सरकारी वकिलांना ७५ हजार रुपये फी दिली जाणार आहे. त्यासाठी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.