शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयला मदत करणे शासनाने जाणीवपूर्वक टाळले

By admin | Updated: August 21, 2015 00:54 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आल्यानंतर वारंवार मागणी करूनही तपासासाठी लागणारे अधिकारी व कर्मचारी राज्य शासनाने दिले नाहीत. तपासाच्या नावाखाली राज्यशासन ढोंगबाजी करत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंनिसचे अध्यक्ष एन. डी. पाटील यांनी गुरूवारी केला.दाभोलकर यांच्या खूनाला २ वर्षे पूर्ण होऊन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ महर्षी शिंदे पूल ते मनोहर मंगल कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. यावेळी खासदार हुसेन दलवाई, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अंनिसचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, कामगार नेत्या मुक्ता मनोहर व अन्य मान्यवर उपस्थित होते. सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्याकडे तपास दिला त्याला अंनिस ही संघटना नेमकी काय आहे याचीच माहिती नाही, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.सोलापुरात धरणे सोलापूर : डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात मारेकरी सापडत नसल्याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले़ ‘फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर,’ डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, या घोषणांनी गुरुवारी सातारा शहर दणाणले. नगरमध्ये अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़