शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाचे नियोजनच नाही!

By admin | Updated: July 22, 2014 00:41 IST

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाने कोणतेही नियोजन केले नसून, राज्यातील शेतकर्‍यांचे जवळपास २00 कोटी रू पयांचे अनुदान थकले

अकोला : शेतीतील पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाने कोणतेही नियोजन केले नसून, राज्यातील शेतकर्‍यांचे जवळपास २00 कोटी रू पयांचे अनुदान थकले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांसाठी केंद्र शासनाने सुक्ष्म सिंचन योजना सुरू केली असून, २0११-१२ मध्ये या योजनेसाठी ८२.३५ कोटी रू पये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६७.८३ कोटी रूपयांचे अनुदान केंद्र शासनाने दिले; मात्र उर्वरित १५.६ कोटी रूपये तीन वर्षापासून रखडले आहेत. हे अनुदान आता राष्ट्रीय कृषी विकास योजनतून देण्यात येणार असल्याचे वृत्त असले तरी, अद्याप हा पैसा शेतकर्‍यांच्या हाती पडला नाही. २0१२-१३ पासून या योजनेची विभागणी करण्यात आली. त्यानुसार विदर्भात विदर्भ सिंचन विकास प्रकल्प (व्हीआएआएडीपी) आणि उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात आहे. व्हीआयआयडीपी योजना विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व भंडारा हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्हयांत राबविण्यात आली. या योजनेंतंर्गत २0१२-१३ मध्ये विदर्भाला १0३ कोटी रुपये मिळाले होते. त्यातील ९७ टक्के रक्कम रितसर खर्च झाली. त्यावेळी विदर्भातील सर्वच जिल्हय़ांचा या योजनेत समावेश होता. यामध्ये अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांना १६ कोटी १५ लाख ५९ हजार रुपये अनुदान मिळाले. २0१३-१४ करिता ९४ कोटी ३८ लाख रू पये मंजूर झाले होते. त्यातील ७२ कोटी ११ लाख ७३ हजार रुपये अनुदान शेतकर्‍यांना मिळाले आहे. उर्वरित अनुदान मात्र शासनाकडे थकीत आहेत. उर्वरित राज्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एनएमएमआय योजनेंतर्गत २0१२ -१३ साठी १९८ कोटी १७ लाख मंजूर झाले होते. त्यापैकी १४७ कोटी ८५ लाख रूपये एवढेच अनुदान प्राप्त झाले आहे. जवळपास ४0 कोटी रूपये अनुदानाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे.

** गतवर्षीचे २00 कोटी रूपये थकले

२0१३-१४ मध्ये राज्यातील शेतकर्‍यांनी जवळपास २00 कोटीचे ठिबक व तुषार संच खरेदी केले आहे; तथापि शासनाने कोणतेही मार्गदर्शक तत्व अथवा सुचना केल्या नाही. त्यामुळे आधीच ठिबक व तुषार संच खरेदी करणारे शेतकरी आर्थिक अडचनीत सापडले आहेत. या सर्व शेतकर्‍यांना आता अनुदानाची प्रतिक्षा आहे.

** शेतकर्‍यांचे शेकडो अर्ज धूळ खात

२0१४-१५ सालासाठी मार्गदर्शक तत्व व सुचनाही संबधीत विभागाला प्राप्त झाल्या आहेत; पंरतु गतवर्षी कोणत्याही सुचना नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी या योजनेतंर्गत केलेले शेकडो अर्ज धूळ खात पडले आहेत.