शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला शासनाचा दणका

By admin | Updated: June 13, 2014 01:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एकही मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याने, नागपूर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या आधारावर विद्यापीठाने संलग्नित

प्रवेशबंदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एकही मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याने, नागपूर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या आधारावर विद्यापीठाने संलग्नित २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली. तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर राज्य शासनाने प्रवेशबंदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे आदेशात महाविद्यालयातील प्रवेशावर कोणतेही प्रतिबंध घालण्याबाबत कोणतेही निर्देश न्यायालयाने दिले नव्हते, असा उल्लेख करण्यात आला आहे.

शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ११ जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र विद्यापीठाला पाठविण्यात आले आहे. प्रवेशबंदी लावण्यात आलेल्या २५० महाविद्यालयांपैकी ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकाने विद्यार्थ्यांची व संस्थाचालकांची दिशाभूल करण्यात आली होती काय, असा सवाल करण्यात येत आहे. शासनाने विद्यापीठाच्या निर्णयावर दणका दिल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या आदेशात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अशासकीय व विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेशावर प्रतिबंध घालण्याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. विद्यापीठातील सक्षम प्राधिकारिणी असलेल्या विद्वत् परिषदनेदेखील अशा महाविद्यालयाांचे संलग्नीकरण संपुष्टात आणण्याबाबत किंवा प्रवेशबंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशावर प्रतिबंध घालून शैक्षणिक वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेणे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ८३ च्या तरतुदीचे उल्लघंन करणारे आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.

या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यावर बंदी घालण्यात आली नव्हती. विद्वत् परिषदेने वेळोवेळी या महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटविण्याबाबत व विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करण्याबाबत निर्णय घेतले होते. विद्यापीठ कायदा १९९४ नुसार लोकहितास्तव निर्णय घेताना शासनाने विद्यापीठातील ६३ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करून त्यांची विशेष परीक्षा घेण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)