शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच दिला बेदम चोप

By admin | Updated: July 14, 2017 06:07 IST

कथित गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीचीही मोडतोड केल्याची घटना नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथे बुधवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोमांस विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीचीही मोडतोड केल्याची घटना नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथे बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा चौघांना अटक केली.सलीम इस्माईल शहा (३२) असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. काही दिवसांपासून तो गोमांसाची चोरून विक्री करीत असल्याचा काही जणांना संशय होता. बुधवारी सकाळी दुचाकीवरून तो जलालखेड्याहून भारसिंगी मार्गे काटोलकडे जात असताना काही तरुणांनी त्याला भारसिंगी बसथांब्याजवळ अडविले. त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात काही पिशव्यांमध्ये मांस आढळले. हे गोमांस नसून बैलाचे मांस असल्याचे सलीम सांगत होता. मात्र, या कथित गोरक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष करून सलीमला बेदम मारहाण केली.या मारहाणीत सलीम गंभीर जखमी झाला. पोलिसांनी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्याला लगेच नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविले. गुरुवारी दुपारी त्याला रुग्णालयातून सुटी दिली. पोलिसांनी सलीमकडून १२०० रुपये किमतीचे मांस आणि ४८ हजार रुपयांची अ‍ॅक्टिव्हा जप्त केली. उलटसुलट आरोपांमुळे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला तर, त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मोरेश्वर तांदूळकर (३०), जगदीश चौधरी (२८), अश्विन उईके (२६) व रामेश्वर तायवाडे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जलालखेडा पोलिसांनी जिल्हा पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवून घेतली. सलीम याला गोरक्षणाच्या नावावर बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा भाजपाने निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी यासंबंधी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या घटनेशी भाजपाचा कुठलाही संबंध नाही. सलीम शाह हा भाजपा कार्यकर्ता आहे. स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या कथित गोरक्षकांनी केलेले कृत्य संतापजनक आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोरेश्वर तांदूळकर याचा समावेश आहे. मोरेश्वर प्रहार संघटनेचा नरखेड तालुका प्रमुख आहे. चारही आरोपींना पोलिसांनी गुरुवारी काटोल येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.