शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू आता रेल्वेतही

By admin | Updated: October 3, 2016 05:22 IST

राज्यातील विविध कारागृहांमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू या मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना उपलब्ध केल्या जात आहेत.

मुंबई : राज्यातील विविध कारागृहांमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू या मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना उपलब्ध केल्या जात आहेत. यातील पहिला प्रयोग पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल-जयपूर एक्सप्रेसमध्ये केला जात असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या एक्सप्रेसमधील प्रवाशांना प्रथम चादरी आणि उश्यांचे अभ्रे देण्यात आले. राज्यातील विविध कारागृहांमध्ये महाराष्ट्र जेल इंडस्ट्रिजतर्फे ६६ वस्तू तयार केल्या जातात. या वस्तू पश्चिम रेल्वेकडून विकत घेण्यात आल्या असून त्याबाबतचा करार करण्यात आला आहे. याबाबतची सुरुवात १ आॅक्टोबरपासून करण्यात आली आहे. रेल्वेतील चादरी या ५६ इंच लांब व रुंद असल्याने त्या दुमडून वापरायचा प्रयत्न केल्यास प्रवाशांना तसेच रेल्वेला त्याचा मनस्ताप होतो. त्यामुळे नवीन चादरी ३८ इंचाच्या करण्यात आल्या आहेत. नवीन चादरी पांढऱ्या तसेच अन्य रंगांत आहेत. रेल्वेला चादरी आणि उशांचा पुरवठा करणे ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वर्षी यातून १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आता रेल्वेनेही या वस्तू घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल, अशी आशा कारागृहाच्या उपमहासंचालक स्वाती साठे यांनी व्यक्त केली. प. रे.चे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनीही कैद्यांकडून बनवण्यात आलेल्या वस्तू उत्तम असल्याचे सांगत प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबवला जात असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)>प्रवाशांना चादरी, अभ्रे यांचा पुरवठायेरवडा कारागृहात तयार होणाऱ्या कागदी पिशव्या आणि कोल्हापूर येथील कारागृहात तयार होणाऱ्या चादरी रेल्वे प्रवाशांना उपलब्ध केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल-जयपूर एक्सप्रेसमधील एसी प्रथम श्रेणीचा एक, व्दितीय श्रेणीचा एक आणि तृतीय श्रेणीच्या एक डब्यामधील प्रवाशांना या वस्तू दिल्या जात आहेत.