कर्जत : तालुक्यातील कोषाणे गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या साडेचार किलो मटकीच्या बियाणातून सुमारे साडे चारशे किलो उत्पादन काढून शेती कल्पकतेने केल्यास त्यावर कुटुंब सहज चालू शकते याचा प्रत्यय आणून दिला. गतवर्षी याच शेतकऱ्याने दोन किलो मटकीचे बियाणे वापरून तब्बल दोनशे किलो उत्पादन काढले होते.तालुक्यातील कोषाणे गावातील शेतकरी हरिश्चंद्र ठोंबरे आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेती कशी फायदेशीर होईल हे पाहत असतात. शेतीची एकदा मशागत केल्यानंतर त्यावर चार पाच पिके घेणे. कलिंगड, मका, भेंडी, टोमॅटो, पेरू, भोपळा आदींचे विक्र मी उत्पादन घेणे, एसआरटी पद्धतीने भात पीक घेणे शक्य झाले नव्हते, तेव्हा पेर भात करून चांगले भातपीक घेऊन कोणत्याही प्रकारे शेती ओसाड राहू नये यासाठी झटणाऱ्या ठोंबरे यांनी साडे तीन किलो साधे मटकीचे आणि एक किलो चांगल्या प्रकारचे मटकीचे बियाणे पेरून सुमारे चारशे किलो उत्पन्न काढले आहे. ठोंबरे आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने दुग्ध व्यवसाय गेल्या ३०-३५ वर्षे यशस्वीपणे करीत आहेत. या पिकासाठी त्यांना केवळ १२०० रु पये खर्च आला असून, एक ते सव्वा एक एकर जमिनीवर त्यांनी हे पीक काढले आहे. विशेष म्हणजे, भातपीक काढल्यानंतर कोणत्याही प्रकारची उखळणी अगर मशागत न करता तसेच मटकीचे बियाणे पेरले आणि चांगले उत्पादन काढले. (वार्ताहर)>भात पीक घेणे हा आतबट्ट्याचा व्यवसाय असा समज आहे; परंतु थोडीशी कल्पकता वापरल्यास भाताचे पीकही चांगल्या प्रकारे खर्चाची बचत करून घेता येते. उन्हाळ्यात कडधान्याचे पीक घेतल्यास शेती फायदेशीर होऊ शकते. - हरिश्चंद्र ठोंबरे, प्रगतशील शेतकरी ठोंबरे आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने दुग्ध व्यवसाय गेल्या ३०-३५ वर्षे यशस्वीपणे करीत आहेत. त्याचबरोबर शेती करीत असून मटकी पिकासाठी त्यांना केवळ १२०० रु पये खर्च आला असून, एक ते सव्वा एकर जमिनीवर त्यांनी हे पीक काढले आहे. त्यामुळे यंदा त्यांना या कडधान्य पीकामुळे फायदा झाला आहे.
चार किलो मटकीतून चांगले उत्पादन
By admin | Updated: March 6, 2017 03:19 IST