शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गूळ उत्पादकांसाठी यंदा ‘अच्छे दिन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 02:18 IST

उसाची कमतरता, साखरेचे वाढलेले दर व गुजरात मार्केटमधील मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदा गूळ उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कोल्ड स्टोरेजमधील

- राजाराम लोंढे,  कोल्हापूर

उसाची कमतरता, साखरेचे वाढलेले दर व गुजरात मार्केटमधील मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदा गूळ उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कोल्ड स्टोरेजमधील ‘एक नंबर’च्या गुळाला सध्या ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. नवीन गुळालाही ५१०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. कोल्हापूरला ‘गुळाची बाजारपेठ’ म्हणून ओळखले जाते, पण गेल्या काही वर्षांपासून अनिश्चित दरामुळे ही बाजारपेठ अडचणीत आली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक हजाराहून अधिक गुऱ्हाळघरे सुरू होती, पण मजुरांचा प्रश्न, गूळ दर, साखर कारखान्यांची वाढलेली उचल, यामुळे चारशेच्या आसपास गुऱ्हाळघरे राहिली आहेत. गेल्या वर्षी गुळाचा दर एकदम खाली आला होता. त्यात साखर १९ रुपयांपर्यंत खाली घसरल्याने, गूळ उत्पादकांचे हाल झाले. प्रतिक्विंटल २४०० पासून ३२०० रुपयांपर्यंत गुळाचा दर राहिल्याने शेतकऱ्यांनी ऊस साखर कारखान्यांकडे पाठविणे पसंत केले. त्यामुळे जानेवारीनंतर गुऱ्हाळघरांची धुरांडी थंडावली. यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर, धुवॉँधार पावसाने यंदा नद्यांना दोन वेळा पूर आला. परिणामी, नदीकाठचे ऊस अडचणीत आले आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुऱ्हाळघरांकडे येणाऱ्या उसात किमान २५ टक्के घट होणार आहे. गुजरातमध्ये सध्या गुळाला चांगला दर असून दिवाळीनंतरही तो कायम राहण्याची शक्यता आहे. - बाळासाहेब मनाडे (माजी अध्यक्ष, शाहूपुरी मर्चंट असो., कोल्हापूर )