शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया मेडिकलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातच शक्य

By admin | Updated: July 2, 2014 00:52 IST

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर आता सर्वोच्च न्यायालयातच निर्णय होणे शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रिया गुप्ता वि. छत्तीसगड शासन’ प्रकरणात गेल्या ६ जून रोजी दिलेल्या

हायकोर्टाचा हस्तक्षेपास नकार : ‘एमसीआय’चे स्पष्टीकरण सादरनागपूर : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर आता सर्वोच्च न्यायालयातच निर्णय होणे शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रिया गुप्ता वि. छत्तीसगड शासन’ प्रकरणात गेल्या ६ जून रोजी दिलेल्या निर्णयामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या कार्यक्रमात फेरबदल करण्यास मनाई केली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्र्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष आज, मंगळवारी सुनावणी झाली. गेल्या तारखेला याचिकाकर्त्याचे वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयासोबत भेदभाव करीत असल्याचा आरोप केला होता. कौन्सिल अन्य काही वैद्यकीय महाविद्यालयांचे निरीक्षण करणार असून, गोंदिया महाविद्यालयाचे निरीक्षण करण्याबाबत मात्र त्यांचा आक्षेप आहे, असे त्यांनी सांगितले होते. यानंतर न्यायालयाने ‘एमसीआय’ला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. यावर ‘एमसीआय’ने त्यांनी केवळ जुन्या वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता कायम ठेवावी की नाही, यासंदर्भात निरीक्षण केल्याचे सांगितले. त्यात नवीन मान्यतेचा समावेश नव्हता, असेही ‘एमसीआय’ने स्पष्ट केले. राज्य शासनाने विलंबाने अर्ज केल्यामुळे ‘एमसीआय’ने गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले नाही. निरीक्षणाशिवाय महाविद्यालयाला मान्यता मिळणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. केंद्र शासनाने गेल्या ७ फेब्रुवारी रोजी देशभरातील आठ शहरांत नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गोंदियाचा समावेश आहे. यासाठी केंद्र शासनाने १८९ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी २०० खाटांचे रुग्णालय व १० हेक्टर जमीन आवश्यक होती. शासनाने गोंदिया महाविद्यालयासाठी निर्धारित वेळेत अर्ज केला नाही. यामुळे कौन्सिलने अर्ज फेटाळला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाला पत्र लिहिले. त्यावरही काहीच झाले नाही. (प्रतिनिधी)