शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गोडसेचे उदात्तीकरण देशासाठी घातक - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: December 10, 2015 03:05 IST

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत

सांगली : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत. अशा प्रवृत्ती कायमच्याच संपल्या पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी व्यक्त केले. येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सबनीस म्हणाले, मार्क्सचा विचार घेऊन कॉ. गोविंद पानसरे उभे राहिले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घेऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार घेऊन एम. एम. कलबुर्गी उभे राहिले होते. मात्र या तिघांचीही हत्या करण्यात आली. हा भारतीय लोकशाहीचा, तुमचा आणि आमचा खून आहे. ही प्रवृत्ती आणि ही परंपरा कायमची संपली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, २0१५मध्ये गोडसेच्या नावाने सोहळे साजरे केले जात आहेत. ही गोष्ट हिंदूंचा उन्माद बाळगणाऱ्या लोकांसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही.सरकारच्या संवेदना का संपल्या आणि कोणी मारल्या, हे आपणास कळेनासे झाले आहे. हे वातावरण चांगले नाही. कलेला कधी जात आणि धर्म नसतो. तसे असते तर बिसमिल्ला खाँसाहेबांची शहनाई प्रत्येक जाती-धर्माच्या सोहळ्यामध्ये वाजली नसती. कला आणि संस्कृतीला अशा बंधनात बांधणेही चुकीचे आहे. > ‘इसिस’चा जगभरात धोकापाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे कुचकामी नेतृत्व आहे. भविष्यात याठिकाणची सत्ता लष्कराच्या हाती जाईल आणि चुकून लष्कराची अण्वस्त्रे लष्कर-ए-तय्यबा किंवा ‘इसिस’सारख्या संघटनांच्या हाती गेली, तर जगाचा एकतृतियांश भाग कायमचा संपुष्टात येईल. म्हणून जागतिक पातळीवर इसिस व अन्य दहशतवादी प्रवृत्तींचा धोका सर्वांनाच आहे, असे मतही सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.