शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गोदातीरी आज पहिले कुंभस्नान

By admin | Updated: August 29, 2015 02:11 IST

धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत.

नाशिक : धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत. श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात शनिवारी गोदातीर्थावर पहिले कुंभस्नान होणार आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरी नटल्या आहेत.शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणाऱ्या प्रशासनाची शनिवारी कसोटी लागणार आहे. नाशिकक्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांचे शाहीस्नान होईल, त्यानंतर भाविकांना रामकुंड व कुशावर्त खुले केले जाईल. त्र्यंबकेश्वरी शनिवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ४.१५ वा. जुना आखाड्याचे साधू-महंत प्रथम शाहीस्नान करतील, तर नाशिकला सकाळी ७ वा. निर्वाणी अनी आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान करतील. सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी ९, तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धर्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल. शाही पर्वणी निर्विघ्न पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंड आणि कुशावर्ताचा ताबा घेतला. साधू-महंतांचे स्नान होईपर्यंत भाविकांना दोन्ही तीर्थांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)साध्वींची स्वतंत्र व्यवस्था नाहीमहिला साध्वींच्या स्वतंत्र स्नानाची व्यवस्था पहिल्या पर्वणीत करण्यात आलेली नाही. प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था व वेळ देण्याच्या साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्याबाबत न्यायालयाने तोडगा काढण्याचे सुचविले आहे. सोमवारी त्याबाबत बैठक होणार आहे. शाही स्नानास सुरुवातत्र्यंबकेश्वर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे ४.१५ वाजता नाशिक सकाळी ७ वाजता़़़अन् साध्वींना कोसळले रडू महिला साध्वींच्या स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था व वेळेची मागणी प्रशासनाकडे फेब्रुवारीपासून करीत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ आखाड्यांच्या शाहीस्नानाची नव्हे, तर त्यांच्या नंतरची वेळ दिली असती तरी चालले असते़ केवळ महिला साध्वी म्हणून न्याय मिळत नाही, अशी कैफियत साध्वी त्रिकाल भवंता यांनी शुक्रवारी त्यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांकडे मांडली़ साध्वींची व्यथा मांडताना त्यांना रडू कोसळले़पोलीस बंदोबस्त कर्मचारी : १५,०००आयुक्त : १उपायुक्त : १५साहाय्यक आयुक्त : ४४पोलीस निरीक्षक : २००पोलीस उपनिरीक्षक : ६००बॉम्बशोधक व नाशक पथके : १३एसआरपीएफ : चार तुकड्याफोर्स वन : दोन तुकड्याक्यूआरटी : दोन तुकड्या एटीएस, एसआयडी, सीआयडी व आयबीची स्वतंत्र पथके