शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी मराठा समाजाचा महामोर्चा

By admin | Updated: September 25, 2016 02:14 IST

गोदाकाठी शनिवारी कोपर्डीतील विद्यार्थिनीवरील अत्याचार व हत्येच्या विरोधात मराठा समाजाचा विराट मूकमोर्चा काढण्यात आला.

नाशिक : गोदाकाठी शनिवारी कोपर्डीतील विद्यार्थिनीवरील अत्याचार व हत्येच्या विरोधात मराठा समाजाचा विराट मूकमोर्चा काढण्यात आला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चाने आजवरच्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे विक्रम मोडीत काढले. शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या या मोर्चात महिला व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षवेधक ठरला. तपोभूमी असलेल्या तपोवनातील साधुग्रामच्या जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज प्रवेशद्वारापासून मोर्चाला सकाळी १०.४० वाजता आरंभ झाला. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आणि हाती भगवे ध्वज आणि घोषणाफलक घेत मोर्चात सहभागी झालेला विराट समाज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर गोल्फ क्लब मैदानावर दुपारी श्वेता भामरे या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेल्या निवेदनाचे जाहीर वाचन केले. विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे मागण्यांचे जाहीर वाचन केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसहा मुलींच्या हस्ते सात पानी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना देण्यात आले. साक्षी चव्हाण हिने जिल्हाधिकाऱ्यांसमोर निवेदन वाचून दाखविले. प्रगती पगार, ऋतुजा लोणे, रुचिका ढिकले, तृप्ती कासार, काजल गुंजाळ या विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.