शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासात प्रथमच कोरडी पडली गोदावरी

By admin | Updated: June 9, 2016 23:07 IST

काठोकाठ खळाळणारी नदी ही त्या गावची श्रीमंती मानली जाते. गोदावरी नदीमुळे नाशिकक्षेत्री सुबत्ता आली आणि तीर्थस्थानामुळे ती वाढली. मात्र, बुजुर्गांना ज्ञात असलेल्या इतिहासाचा धांडोळा घेतला

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ९ : काठोकाठ खळाळणारी नदी ही त्या गावची श्रीमंती मानली जाते. गोदावरी नदीमुळे नाशिकक्षेत्री सुबत्ता आली आणि तीर्थस्थानामुळे ती वाढली. मात्र, बुजुर्गांना ज्ञात असलेल्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर गोदामाई पहिल्यांदाच कोरडीठाक पडल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. दर पावसाळ्यात दुतोंड्या मारुतीच्या छातीला भिडून दुथडी भरून वाहणारी गोदामाई यंदाही नक्कीच खळाळून वाहील आणि पुन्हा एकदा गोदाकाठ चैतन्याने बहरून येईल, अशी अपेक्षा तमाम नाशिककर व्यक्त करताना दिसून येत आहेत. मागील वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडून गंगापूर धरण ७० टक्क्याच्या आसपास भरले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार समान पाणीवाटपाचे धोरण राबविताना गंगापूरचा भरलेला घडा पालथा करण्याचे ‘राजकारण’ नाशिककरांनी अनुभवले. त्यानंतर, गेल्या सात महिन्यांपासून गोदावरी प्रवाहित असल्याचा आनंद घेता आलेला नाही. सद्यस्थितीत संपूर्ण गोदापात्र कोरडेठाक पडले असून, बाहेरून येणाऱ्या भाविक-पर्यटकांच्याही मुखातून ‘ऐसी गोदा कभी देखी नहीं’, असे सहजोद्गार बाहेर पडताना दिसून येत आहे. ऐन सिंहस्थ कुंभमेळा काळात गोदावरी पात्र कोरडेठाक झाल्याचे दुर्दैव वाट्याला आले आहे.

गोदामाई कोरडी पडल्याने सिंहस्थवर्षानिमित्त स्नानासाठी येणाऱ्यांचा हिरमोड तर होतो आहेच शिवाय, दशक्रिया विधीप्रसंगी अस्थीविसर्जनालाही पाण्याचा मागमूस दिसत नसल्याने धार्मिक विधीवरही गंडांतर आले आहे. रामवाडी परिसरातील गोदाकाठी तर शुष्क भेगाळलेले पात्र भयावह स्थिती निदर्शनास आणून देते.

उन्हाळ्यात गोदावरी घाटावर सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांना आता कोरड्या पात्राचे विदारक दर्शन घडत आहे. महापुराच्या वेळी गोदावरीत सचैल न्हाऊन निघणारा दुतोंड्याही कोरड्याठाक पडलेल्या पात्राकडे विषण्ण नजरेने पाहतो आहे. नाशिककरांबरोबर आता त्यालाही आस लागली आहे,

भरभरून खळाळून वाहणाऱ्या गोदामाईची. त्यामुळेच कुणी गंगापूजन करते आहे, तर कुणी पर्जन्ययाग करत वरुणराजाला साकडे घालताना दिसून येत आहे. आभाळात गोळा होणाऱ्या नभाने पखवाज वाजवावा आणि भरभरून बरसणाऱ्या जलधारांनी आमची गोदामाई दुथडी भरून वाहावी, अशीच प्रार्थना सारे नाशिककर श्रीरामाला करत आहेत.