शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात गोव्यातील पर्यटकांवर हल्ला

By admin | Updated: August 4, 2015 00:54 IST

मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून रविवारी सायंकाळी घरी परतणाऱ्या गोव्यातील

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून रविवारी सायंकाळी घरी परतणाऱ्या गोव्यातील पर्यटकांना बाजारपेठेत गाठून स्थानिक तरुणांच्या टोळक्याने लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. झरेबांबर येथील या टोळक्याने पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करीत गाडीही फोडली. पर्यटकांच्या डोक्यावर बाटल्या मारण्यात आल्या. त्यात मनोरथ मांजरेकर (३५) व महेश नार्वेकर (३२, दोघेही रा. शारपोरा बारदेश, गोवा) जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोडामार्ग पोलीस ठाण्यात स्थानिक युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. हाणामारीमुळे संध्याकाळी बाजारपेठेत लोकांची धावपळ उडाली. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या व भांबावलेल्या पर्यटकांना पोलिसांच्या स्वाधीन केले; तर हल्लेखोर तरुणांचे टोळके गर्दीचा फायदा घेत पसार झाले. दुपारी १२च्या सुमारास गोव्यातील पर्यटक व झरेबांबर येथील स्थानिक युवकांमध्ये गाडी पार्किंगवरून वाद झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत मद्याच्या नशेत असलेल्या युवकांच्या टोळक्याला तेथून जाण्यास सांगितले होते. संध्याकाळी गोव्याचे पर्यटक घरी परतत असताना झरेबांबर येथे टोळक्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या पर्यटकांनी त्यांची दोन्ही वाहने भरधाव वेगाने नेली. टोळक्याने दोन वाहनांतून त्यांचा पाठलाग केला होता. (प्रतिनिधी)