शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

-तर १५ वाघ जिवानिशी जाणार

By admin | Updated: August 27, 2014 00:54 IST

महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम

वन कर्मचाऱ्यांचा संप : 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'चा इशारावैभव बाबरेकर - अमरावतीमहाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'ने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रणा ठेवणारे हे बोर्ड पंतप्रधानांच्या देखरेखीत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील १२ हजार वनरक्षक, २ हजार वनपाल आणि ५ हजार वन कामगारांनी विविध मागण्यांच्या पुर्तेतेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. मंगळवार हा या आंदोलनाचा दुसरा दिवस असून कामबंद आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वन्यप्राण्याच्या संरक्षणाबाबत मोठे संकट निर्माण झाले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांना बसला आहे. आधीच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रडारवर आहे. त्यातच वन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु झाल्याने आंतरराष्ट्रीय तस्करांची टोेळी महाराष्ट्रातील जंगलामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) व वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डाने दखल घेऊन तसा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड अस्तित्त्वात आहे. महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प असून येथे वाघांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाला चौथ्या क्रमांकाचा दर्जा आहे. जंगलात काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ताडोबा, सह्याद्री, पेंच व मेळघाट या प्रदेशातील जंगल आंतरराष्ट्रीय तस्करांद्वारे लक्ष्य केले जाईल, अशी भीती पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी मध्यस्थी करुन राज्य सरकारशी चर्चा करावी व संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही अहवालातून करण्यात आली आहे.